प्रियांका चोप्रा पुन्हा झळकली ‘जिमी किमेल लाईव्ह’मध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2017 20:10 IST
‘पिपल्स चॉईस अवॉर्ड’ दुसऱ्यांदा जिंकल्यानंतर त्याचा आनंद सेलिब्रेट करण्यासाठी प्रियांका चोप्रा पोहोचली जिमी किमेलच्या शोवर. या शोवरती येण्याची तिची ही दुसरी वेळ आहे. काळ्या ड्रेसमध्ये प्रियांका अत्यंत हॉट दिसत होती.
प्रियांका चोप्रा पुन्हा झळकली ‘जिमी किमेल लाईव्ह’मध्ये
‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा सध्या स्टारडमच्या शिखरावर विराजमान आहे. बॉलीवूड काबीज केल्यानंतर तिने हॉलीवूडमध्येसुद्धा घट्ट पाय रोवले असून तेथील प्रेक्षकांना तिच्या प्रेमात पडण्यास भाग पाडले. म्हणून पाठोपाठ दुसऱ्या वर्षी ती ‘पीपल्स चॉईस अवॉर्ड’ची मानकरी ठरली. त्याचबरोबरच तिने लोकप्रिय कॉमेडी शो ‘जिमी किमेल लाईव्ह!’ मध्येसुद्धा दुसऱ्यांदा हजेरी लावली आहे.होस्ट जिमी किमेलसोबत मागच्या वेळी धमाल-मस्ती केल्यानंतर यावेळी ती काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आधीच्या भागात तिने अमेरिकेत शिकत असतानाचे अनुभव शेअर केले होते. हॉलीवूडमध्ये न्यू कमर ते आता प्रस्थापित स्टार हा प्रवास कसा याविषयी ती बोलणार आहे.या एपिसोडच्या टीझरमध्ये प्रियांकाने काळ्या रंगाचा स्टायलिश ड्रेस घातलेला आहे. लोकप्रिय कलाकार म्हणून लोकांनी निवडून दिल्यानंतरचा आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे झळकतो. सध्या ती ‘क्वांटिको’च्या दुसऱ्या सीझनची शूटींग करीत आहे. त्याच बरोबर ती मे महिन्यात प्रदर्शित होणाऱ्या ‘बेवॉच’मध्ये मुख्य नायिका म्हणून हॉलीवूड डेब्यू करीत आहे. यामध्ये ड्वेन जॉन्सन (द रॉक) आणि झॅक अॅफ्रॉन तिचे को-स्टार्स आहेत.ALSO READ: दीपिका पदुकोण आणि जेम्स कॉर्डनचा व्हेरी फनी लुंगी डान्स‘क्वांटिको’ या सिरीयलमधून जगाला तिची दखल घेण्यास भाग पाडणारी प्रियांका अनेक नवनवीन टप्पे पादक्रांत करीत आहे. एनेल पॉम्पोई, केरी वॉशिंग्टन, तराजी पी, हेन्सन आणि व्हयोला डेव्हिस यासारख्या अभिनेत्रींनी मागे टाकत तिने पिपल्स चॉईस अवॉर्डमध्ये फेव्हरेट ड्रॅमॅटिक टीव्ही अॅक्ट्रेसवर स्वत:ची मोहोर उमटविली. पुरस्कार स्वीकारताना दिलेल्या स्पीचमध्ये ती म्हणाली होती की, ‘मी स्वत:ला ड्रामा क्वीन मानते. इथपर्यंतचा प्रवास खरोखरंच स्वप्नवत होता. माझ्यासोबत नामांकित सर्व गुणी अॅक्ट्रेसेस मला अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा देतात. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मला मत आणि प्रेम देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे, चाहत्यांचे खूप खूप आभार.’