Join us

प्रियंका अँग्री यंग वुमन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 14:04 IST

'जय गंगाजल' मध्ये प्रियंका चोप्रा हिने पोलीस अधिकारी महिलेची भूमिका केली आहे. ती म्हणते,' अमिताभ बच्चन माझी प्रेरणा असून ...

'जय गंगाजल' मध्ये प्रियंका चोप्रा हिने पोलीस अधिकारी महिलेची भूमिका केली आहे. ती म्हणते,' अमिताभ बच्चन माझी प्रेरणा असून या अँग्री वुमनच्या अवतारात मी त्यांच्यामुळेच दिसते आहे. चित्रपटात बंके पूर जिल्ह्यातील एसपी ती असून भ्रष्ट्राचारी राजकीय नेते हे दबाव आणत असतात.प्रकाश झा दिग्दर्शित 'जय गंगाजल' याचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला असून सर्वांनी तिच्या भूमिकेचे कौतुक केले आहे. बिग बी यांनी तिला ट्विट केले की,' वाह भैया क्या बात है..अब तो हम लोगन पे भारी पड गये हो!'तेव्हा तिने रिप्लाय केला की,' हाहाहा..थँक यू सो मच सर! द इन्स्पायरेशन ऑफ अँन अँग्री यंग वुमन इज ऑल यू. ' अमिताभ बच्चन यांनी 'जंजीर','दीवार' या चित्रपटांमध्ये अँग्री यंग मॅनची भूमिका केली आहे.जय गंगाजल ४ मार्च रोजी रिलीज होणार आहे.