Join us

​ प्रिया प्रकाश वारियर देणार का रणवीर सिंगला होकार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2018 10:14 IST

काही सेकंदाच्या एका व्हिडिओ क्लिपने इंटरनेट सेन्सेशन बनलेली मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर हिला बॉलिवूडमध्ये पाहणे कुणाला आवडणार नाही?  ...

काही सेकंदाच्या एका व्हिडिओ क्लिपने इंटरनेट सेन्सेशन बनलेली मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर हिला बॉलिवूडमध्ये पाहणे कुणाला आवडणार नाही?  होय, सगळे काही जुळून आले तर प्रिया लवकरच बॉलिवूडमध्ये दिसेल आणि ती सुद्धा रणवीर सिंगसोबत. एका रात्रीत स्टार झालेल्या प्रियाच्या अदा आणि नख-यांनी संपूर्ण देशाला वेड लावले आहे. बॉलिवूडही यातून सुटलेले नाही. बॉलिवूडचे अनेक बडे दिग्दर्शक प्रियाला आपल्या चित्रपटात घेण्यासाठी उत्सूक आहेत. या उत्सूक असणाºयांमध्ये करण जोहर आणि रोहित शेट्टी यांचाही समावेश आहे. होय, रणवीर सिंग स्टारर ‘सिम्बा’ या आगामी चित्रपटासाठी करण व रोहितला प्रिया हिरोईन म्हणून हवी आहे. सूत्रांच्या मते, करण या चित्रपटासाठी प्रियाला साईन करू शकतो. या चित्रपटात रणवीर सिंग पोलिस अधिकाºयाच्या भूमिकेत आहे. खरे तर यात हिरोईनची भूमिका फार मोठी नाही. पण प्रियाची लोकप्रीयता बघता, तिला या चित्रपटात घेण्यासाठी करण व रोहित दोघेही उत्सूक आहेत. त्यामुळे प्रियाने होकार दिलाच तर प्रिया व रणवीर सिंग अशी नवी कोरी जोडी या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळू शकते.  प्रिया स्वत:  रणवीरची खूप मोठी चाहती आहे. बॉलिवूडच्या पहिल्याच चित्रपटात रणवीरसोबत काम करण्याची संधी मिळत असेल, तर ती प्रियाला हवीचं असेल. त्यामुळे प्रिया करणच्या या आॅफर्सचा विचार करेल, असे आम्हाला तरी वाटतेय. पण सर्वस्वी निर्णय प्रियाचा आहे. प्रिया रणवीरला होकार देते का, ते बघूच.ALSO READ :  प्रिया प्रकाश वारियरला कंपन्यांची लाखोंची आॅफर्स! एक पोस्ट शेअर करायचे मिळणार इतके लाख!‘ओरू अडार लव’ या चित्रपटातील ‘मानिका मलयारा पूवी’ या गाण्याच्या एका क्लिपने प्रिया प्रकाशला एका रात्रीत स्टार बनवले. ही क्लिप इतक्या वेगाने व्हायरल झाली की, एकाच दिवसांत प्रियाच्या इन्स्टाग्राम फॉलोवर्सची संख्या सहा लाखांवर पोहोचली. या फॅन फॉलोविंगने प्रियाला जगातील तिसरी पॉप्युलर इन्स्टा सिलेब्स बनवले. या व्हिडिओत प्रिया प्रकाश ‘आंखों ही आंखों में’रोमान्स करताना दिसली होती.   प्रिया ही केरळच्या त्रिशूरची राहणारी आहे.  डान्स आणि भटकंती हे तिचे आवडते छंद आहेत. बी कॉम फर्स्ट ईअरची विद्याथीर्नी असलेली प्रिया सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. ‘ओरू अडार लव’ या    चित्रपटात प्रिया एका किशोरवयीन मुलीच्या भूमिकेत आहे. किशोरवयात मनात फुलू लागलेल्या प्रेमाची कथा यात आहे. हा प्रियाचा डेब्यू सिनेमा आहे.