Join us  

​जय मेहतासोबत लग्न करण्याआधी या अभिनेत्यासोबत जुही चावलाचे झाले होते लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2017 11:58 AM

जय मेहतासोबत लग्न करण्याआधी जुहीचे एका अभिनेत्यासोबत लग्न झाले होते हे वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल पण तिचे ...

जय मेहतासोबत लग्न करण्याआधी जुहीचे एका अभिनेत्यासोबत लग्न झाले होते हे वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल पण तिचे लग्न काही खरेखुरे झाले नव्हते. तिचा एक छोटासा फॅन तिच्या प्रेमात पडला होता आणि त्याने तिला लग्नाची मागणी घातली होती. एवढेच नव्हे तर त्याने तिच्यासाठी एक अंगठी घेतली होती आणि ही अंगठी तिच्या हातात घातली होती. अंगठी घातल्याने जुहीसोबत त्याचे लग्न झाले असा या चाहत्याचा समज होता.जुहीचा हा छोटासा चाहाता आणखी कोणी नसून आमिर खानचा भाचा आणि अभिनेता इम्रान खान आहे. आमिर आणि जुहीने त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. त्यामुळे आमिर आणि जुहीची खूप चांगली मैत्री आहे. इम्रान हा आमिरचा लाडका भाचा असल्याने आमिरच्या काही चित्रपटांमध्ये त्याने काम केले आहे. जो जिता वही सिकंदर या चित्रपटात आमिरच्या लहानपणाची भूमिका त्यानेच साकारली होती. इम्रान चित्रपटात नसला तरी अनेक वेळा आमिरच्या चित्रीकरणासाठी तो आवर्जून जायचा. जुहीच्या आणि आमिरच्या अनेक चित्रपटांच्या चित्रीकरणाच्या वेळी इम्रान यायचा. त्याला जुही तेव्हा प्रचंड आवडायची. तो चित्रपटाच्या सेटवर आल्यावर आमिरपेक्षा जुहीसोबतच जास्त वेळ घालवायचा. जुहीच्या तो अक्षरशः प्रेमात पडला होता आणि त्याने जुहीला लग्नाची मागणी देखील घातली होती आणि जुहीने देखील ही मागणी मान्य केली होती. एकदा तर जुहीसोबत लग्न करण्यासाठी इम्रानने चक्क एक अंगठी आणली होती आणि ही अंगठी जुहीच्या हातात घातली होती. जुहीच्या हातात मी अंगठी घातली म्हणजे माझे आणि जुहीचे लग्न झाले असेच तो सगळ्यांना सांगत होता. तीन-चार दिवस तरी जुहीने ही अंगठी तिच्या हातात ठेवली होती. पण नंतर जुहीपेक्षा ही अंगठी मी दुसऱ्या कोणत्या तरी मुलीला देईन असा विचार करत इम्रानने ही अंगठी तिच्याकडून परत घेतली होती. या घटनेमुळे माझे पहिले लग्न इम्रान सोबत झाले आहे असे जुही अनेक वेळा सगळ्यांना मस्करीत सांगते. Also Read : दिल तो पागल है या चित्रपटात करिश्मा कपूर नव्हे तर ही अभिनेत्री होती दिग्दर्शकाची पहिली चॉईस