Join us

पुरब शिकतोय अरेबिक भाषाअ भिनेता पुरब कोहली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 12:39 IST

अ भिनेता पुरब कोहली अक्षय कुमारचा आगामी चित्रपट 'एअरलिफ्ट' साठी शूटिंग करत असून तो त्यासोबतच अरेबिक भाषेचे काही धडे ...

अ भिनेता पुरब कोहली अक्षय कुमारचा आगामी चित्रपट 'एअरलिफ्ट' साठी शूटिंग करत असून तो त्यासोबतच अरेबिक भाषेचे काही धडे गिरवत आहे. तसेच तो अरेबिक संस्कृतीकडे आकर्षित होत आहे. अरब देशात 'एअरलिफ्ट' चित्रपटाचे शूटिंग सुरू असून अरेबिक भाषेचे धडेही पुरब घेतोय. मी अरेबियन संस्कृतीकडे आकर्षित होतोय. मला खुप दिवसांपासून अरेबियन भाषा शिकायची होती. काही महिन्यांपासून मी उर्दुही शिकतोय. मला मिळालेला शिक्षक खरंच खुप चांगला आहे. त्यामुळे मी भाषा शिकतोय, वाचतोय आणि लिहितोयही. 'एअरलिफ्ट' मध्ये मी इब्राहीम दुर्रानीची भूमिका साकारतोय. इराक-कुवैत युद्धावेळी कुवैत मध्ये भारतीयांना पकडून ठेवले होते. त्यांना सोडवण्यासाठी अक्षय कुमारचे कॅरेक्टर पुढे येते. यावर आधारित 'एअरलिफ्ट' ची कथा आहे. चित्रपट पुढील वर्षी २२ जानेवारी रोजी प्रदर्शित होईल.