Join us  

प्रेग्नंट समीरा रेड्डीचे बोल्ड फोटोशूट, दुस-यांदा बनणार आई

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2019 8:00 AM

अभिनेत्री समीरा रेड्डी सध्या प्रेग्नंसी पीरियड एन्जॉय करतेय. २०१५ मध्ये समीराने तिच्या पहिल्या मुलाला जन्म दिला. लवकरच समीरा दुस-यांदा आई होणार आहे.

ठळक मुद्देसमीराचे उद्योगपती विजय माल्यासोबत खास नाते आहे. समीराचे कन्यादान विजय माल्या यानेच केले होते. समीरा माल्याला अंकल संबोधते.

अभिनेत्री समीरा रेड्डी सध्या प्रेग्नंसी पीरियड एन्जॉय करतेय. २०१५ मध्ये समीराने तिच्या पहिल्या मुलाला जन्म दिला. लवकरच समीरा दुस-यांदा आई होणार आहे. प्रेग्नंसी पीरियड एन्जॉय करत असतानाच समीराचे एक नवे फोटोशूट सध्या चर्चेत आहे. होय, समीराने आपल्या बोल्ड फोटोशूटचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. Beauty begins the moment you decide to be yourself 🌟 Coco Chanel असे हे फोटो शेअर करताना तिने लिहिले आहे.

२०१२ मध्ये प्रदर्शित ‘तेज’ या चित्रपटात समीरा शेवटची झळकली होती. या चित्रपटात तिच्याशिवाय अजय देवगण, बोमण ईराणी व अनिल कपूर हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटानंतर समीरा बॉलिवूडपासून दूर झाली. यामागेही मुलाचे प्लॅनिंग हेच कारण होते. दुसºया प्रेग्नंसीची बातमी शेअर करताना समीरा यावर बोलली होती. हा आमचा प्लान्ड बेबी आहे. त्यामुळेच मी अनेक प्रोजेक्टला नकार दिला होता, असे तिने सांगितले होते.

अडीच वर्षांच्या डेटींगनंतर २१ जानेवारी २०१४ रोजी समीराने मराठमोळा उद्योजक  अक्षय वर्देसोबत लग्न केले होते.  ती अक्षयच्या कंपनीने मॉडिफाय केलेल्या बाईक चालवायची. एक दिवस ती अक्षयला भेटली आणि दोघांमध्ये मैत्री झाली व मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. समीराला बाइक्सची विशेष आवड असल्याने अक्षय लग्नाच्या दिवशी घोडीवर नव्हे तर बाईकवर स्वार होऊन लग्नमंडपात पोहोचला होता. २५ मे २०१५ रोजी समीराने आपल्या पहिला मुलाला जन्म दिला होता.

समीराने २००२ मध्ये रिलीज झालेल्या ‘मैंने दिल तुझको दिया’ या सिनेमाद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. मात्र तिचे फिल्मी करिअर फारसे यशस्वी ठरु शकले नाही. नंतर तिने आपला मोर्चा दक्षिणेकडे वळवला. अनेक तेलगू, तामिळ, कन्नड, मल्याळम व बंगाली चित्रपटांत तिने काम केले. अनेक चित्रपटात ती आयटम सॉन्ग करतानाही दिसली. लग्नानंतर मात्र तिने बॉलिवूडला कायमचा रामराम ठोकला.

समीराचे उद्योगपती विजय माल्यासोबत खास नाते आहे. समीराचे कन्यादान विजय माल्या यानेच केले होते. समीरा माल्याला अंकल संबोधते. माल्याच्या अनेक कौटुंबिक कार्यक्रमात समीरा दिसली आहे.

टॅग्स :समीरा रेड्डी