Join us  

कारमधून उतरताना गेला प्रेग्नंट करिना कपूरचा तोल, पण...  

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2020 4:39 PM

सध्या बेबो तिची प्रेग्नंसी एन्जॉय करतेय. अर्थात या दिवसांत आराम करण्याऐवजी बेबो काम करतेय.

ठळक मुद्देआमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’ या सिनेमात करिना दिसणार आहे. 2021 मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.

बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर लवकरच दुस-यांदा आई बनणार आहे. सध्या बेबो तिची प्रेग्नंसी एन्जॉय करतेय. अर्थात या दिवसांत आराम करण्याऐवजी बेबो काम करतेय. मात्र वजन वाढल्याने आता तिला चालणे फिरणे कठीण झाले आहे.   नुकतीच करिना तिच्या घराबाहेर दिसली. मात्र यादरम्यान कारमधून उतरताना तिचा तोल गेला. अशात करिनाने कसेबसे स्वत:ला सांभाळले.यावेळी करिनाने लाईट ब्ल्यू कलरचा लॉन्ग सलवार सूट केला होता. कारमधून बाहेर आल्यावर करिनाने फोटोग्राफरला हसत हसत पोज दिल्यात.

मी प्रेग्नंट आहे, आजारी नाही, असे करिना नुकतीच म्हणाली होती. प्रेग्नंट असूनही सतत काम करण्याबद्दल ती बोलत होती. एका ताज्या मुलाखतीत ती यावर भरभरून बोलली होती. प्रेग्नंट आहे म्हणून मी काम करणार नाही, असे म्हणणा-यांपैकी मी नाही. मला आवडते ते काम मी करते. मला जे आवडते, तेच मी करतेय. यामुळे मी आनंदी राहते आणि माझे बाळही, असे ती म्हणाली होती.काम करण्यासोबत करिना तिच्या कुटुंबासोबत आणि मित्रांसोबतही एन्जॉय करतेय. नुकतीच तिच्या घरी ख्रिसमसची पार्टी झाली. या पार्टीत सर्वांनी धम्माल मज्जा केली होती. या पार्टीचे काही फोटो सोशल मीडियावरही व्हायरल झाले होते.

 आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’ या सिनेमात करिना दिसणार आहे. 2021 मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. याशिवाय करण जोहरच्या ‘तख्त’ या सिनेमातही ती झळकणार आहे.

अलीकडे एका मुलाखतीत बेबो तिच्या दुस-या प्रेग्नंसीवर बोलताना दिसली होती. अशी कोणती गोष्ट आहे, जी दुस-या प्रेग्नंसीत तुला करायची नाही, असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता. यावर मला खूप जास्त वजन वाढवायचे नाही, असे ती म्हणाली होती. तैमूरच्यावेळी प्रेग्नंट असताना मला सर्वांनी खूप खाण्याचा सल्ला दिला होता आणि मी नुसते खात सुटले होते. यामुळे माझे वजन 25 किलो वाढले होते. आता मला पुन्हा असे करायचे नाही. मला फक्त हेल्दी व फिट राहायचे आहे, असे ती म्हणाली होती.

टॅग्स :करिना कपूर