Join us

प्रीति देणार ग्रँडरिसेप्शन!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2016 16:27 IST

बॉलिवूड अभिनेत्री प्रीति झिंटा आणि तिचा अमेरिकन प्रेमी जेन गुडइनफ गत २९ फेबु्रवारीला लग्नगाठीत अडकले आणि आता या जोडप्याने भारतात ग्रँडरिसेप्शन देण्याची तयारी चालवली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री प्रीति झिंटा आणि तिचा अमेरिकन प्रेमी जेन गुडइनफ गत २९ फेबु्रवारीला लग्नगाठीत अडकले आणि आता या जोडप्याने भारतात ग्रँडरिसेप्शन देण्याची तयारी चालवली आहे. या ग्रँड रिसेप्शनसाठी प्रीतिचा जेन आपल्या माता-पित्यासोबत मुंबईत दाखल झाला आहे. प्रीतिने अतिशय गूपचूपरित्या विवाह केला होता. तिच्या लग्नाला बॉलिवूडमधील चार-दोन जण सोडले तर कुणीच सामील होऊ शकले नव्हते. मात्र लग्नानंतर प्रीति भारतात एक ग्रँड रिसेप्शन देणार, हे त्यावेळीच स्पष्ट झाले होते. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार, येत्या १३ मे रोजी प्रीति रिसेप्शन देते आहे. जेन व त्याची फॅमिली मुंबई एअरपोर्टवर पोहोचली. प्रीतिने त्यांना रिसीव्ह केले. यावेळीची काही छायाचित्रे खास तुमच्यासाठी...