Join us  

स्मिता...! मी आईचे नाव हृदयावर कोरले...; प्रतिक बब्बरचा टॅटू पाहून तुम्हीही व्हाल भावुक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 12:48 PM

होय, प्रतिकने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आणि हा फोटो पाहून चाहते भावुक झालेत.

ठळक मुद्दे13 डिसेंबर 1986 रोजी स्मिता पाटील यांचे निधन झाले. प्रतिकच्या जन्मानंतर काहीच दिवसात स्मितांनी जगाचा निरोप घेतला होता. 

बॉलिवूड अभिनेता प्रतिक बब्बर फार कमी सिनेमात दिसतो. पण ज्यात दिसतो, त्या सिनेमातील दमदार अभिनयानं सर्वांची मनं जिंकतो. आता प्रतिकने पुन्हा एकदा चाहत्यांची मनं जिंकली आहेत. होय, प्रतिकने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आणि हा फोटो पाहून चाहते भावुक झालेत.या फोटोत असं काय आहे तर आईच्या म्हणजेच स्मिता पाटील यांच्या नावाचा टॅटू. होय, प्रतिकने छातीवर आईच्या नावाचा टॅटू काढला आहे.

फोटोत प्रतिक त्याच्या कुत्र्यासोबत पहुडलेला दिसतोय आणि त्याच्या छातीपर ‘स्मिता’ असा टॅटू गोंदवलेला आहे. ‘स्मिता’ या नावासोबत एक स्टार आहे आणि खाली 1955 - इनफिनिटी असे लिहिले आहे. तुम्हाला ठाऊक असेलच की, स्मिता यांचा जन्म 1955 साली झाला होता.हा फोटो शेअर करताना प्रतिकने लिहिलेले कॅप्शनही भावुक करणारे आहे. ‘आईचे नाव हृदयावर कोरलेय’, या आशयाचे कॅप्शन प्रतिकने दिले आहे.

आईचे नाव जिथे असायला हवे, तिथेच लिहिले...

मी खूप वर्षांपासून आईच्या नावाचा टॅटू बनवू इच्छित होतो. पण अनेक वर्ष मी निर्णय घेऊ शकलो नव्हतो. आता हा एकदम मस्त जमलाय. आईचे नाव जिथे असायला हवे, तिथेच मी लिहिले आहे. ती सतत आता माझ्या हृदयाजवळ असेन, असे प्रतिक म्हणाला.13 डिसेंबर 1986 रोजी स्मिता पाटील यांचे निधन झाले. प्रतिकच्या जन्मानंतर काहीच दिवसात स्मितांनी जगाचा निरोप घेतला होता. आईच्या निधनानंतर प्रतिक आपल्या आजीकडे लहानाचा मोठा झाला. या काळात आपल्या वडिलांचा प्रचंड द्वेष करायचा. याच काळात तो ड्रग्जच्या आहारी गेला होता़ अर्थात आज प्रतिक या सगळ्यांतून बाहेर पडला आहे. पण एका मुलाखतीत प्रतिकने खासगी आयुष्यातील त्या दिवसांबद्दल सांगितले होते.

एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत त्याने याबद्दल खुलासा केला होता. ‘माझ्या वडिलांना माझ्यासाठी वेळ नव्हता. सगळे लोक मला माझ्या आईच्या यशाबद्दल सांगायचे. पण मला त्यामुळे काहीही फरक पडणार नव्हता. आई माझ्यासोबत का नाही, या एकाच प्रश्नाने मी बैचेन होतो. वयाच्या 12 व्या वर्षी मी ड्रग्जच्या आहारी गेलो होतो. त्यामुळे एकदा नाही तर दोनदा मला रिहॅब सेंटरमध्ये भरती करण्यात आले. ड्रग्जने मला मरणाच्या दारात उभे केले होते. माझी आजी माझ्या आईसारखी होती. पण नातवाचे हाल बघून माझ्या चिंतेत तिने प्राण सोडले. एक दिवसही ड्रग्ज मिळाली नाही की मी अस्वस्थ व्हायचो,’ असे प्रतिकने या मुलाखतीत सांगितले होते.

टॅग्स :प्रतीक बब्बरस्मिता पाटील