Join us  

‘नोटबुक’ची अभिनेत्री प्रनूतनने जगापासून लपवले आडनाव; पण का?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2019 4:00 PM

प्रनूतन बहल बॉलिवूड डेब्यूसाठी तयार आहे. ‘नोटबुक’ या चित्रपटातून प्रनूतन बॉलिवूड डेब्यू करतेय. जहीर इक्बाल हा या चित्रपटात प्रनूतनचा हिरो आहे. जहीरचाही हा डेब्यू सिनेमा आहे.

ठळक मुद्देप्रनूतन आणि जहीर यांच्या अभिनयाने सजलेला ‘नोटबुक’ हा सिनेमा येत्या २९ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे.

प्रनूतन बहल बॉलिवूड डेब्यूसाठी तयार आहे. ‘नोटबुक’ या चित्रपटातून प्रनूतन बॉलिवूड डेब्यू करतेय. जहीर इक्बाल हा या चित्रपटात प्रनूतनचा हिरो आहे. जहीरचाही हा डेब्यू सिनेमा आहे.प्रनूतनची आजी नूतन यांना कोण विसरू शकेल. नूतन यांनी अनेक अजरामर भूमिका साकारल्या. प्रनूतनचे पापा मोहनीश बहल हेही बॉलिवूडमधील एक मोठे नाव आहे. आता आजी आणि पापाच्या पावलावर पाऊल ठेवत प्रनूतन हिनेही बॉलिवूडची वाट निवडली आहे. पण या वाटेवर प्रवास एकटीने करायचा, स्वबळावर करायचा हा प्रनूतनचा हट्ट होता आणि याचमुळे स्ट्रगलच्या काळात ‘बहल’ हे आडनाव लावणे ती टाळायची. अलीकडे एका मुलाखतीत प्रनूतनने यामागचे कारण सांगितले.

तिने सांगितले की, २०१६ मध्ये मी आॅडिशन्स देणे सुरु केले. त्याकाळात मी माझ्या नावापुढे ‘बहल’ हे आडनाव लावणे टाळायचे. कारण एकच होते, जे काही मिळवायचे ते मला स्वबळावर मिळवायचे होते. पापा आणि आजी यांच्या नावाचा, लौकिकाचा वापर न करता मला ही परीक्षा पास करायची होती. माझ्यामते, अभिनेत्री बनायचे तर एक प्रक्रिया पाळणे गरजेचे होते. मी तेच केले.

नोटबुक’ हा चित्रपट कसा मिळाला, हेही तिने सांगितले. त्यांनी सोशल मीडियावर माझे फोटो पाहिले होते. माझा फोटो पाहून या चित्रपटातील भूमिकेसाठी मी एकदम योग्य असल्याचे त्यांना वाटले. त्यांनी मला भेटायला बोलवले. नितीन सर (चित्रपटाचा दिग्दर्शक नितीन कक्कर) टास्कमास्टर आहेत. त्यांना १०० टक्के परफेक्ट काम पाहिजे. मी ते दिले आणि कदाचित म्हणून मी आज या चित्रपटात आहे, असे तिने सांगितले.

प्रनूतन आणि जहीर यांच्या अभिनयाने सजलेला ‘नोटबुक’ हा सिनेमा येत्या २९ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे.

टॅग्स :प्रनूतन बहलनोटबुक