प्रकाश राज यांना पुत्ररत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 08:11 IST
‘सिंघम’मधून जयकांत शिखरेच्या भूमिकेतून सर्वांना परिचित झालेला अभिनेता प्रकाश राजची हिंदी सिनेमातील गे्रटेस्ट व्हिलेनच्या यादीत नाव घेतले जाते. आता ...
प्रकाश राज यांना पुत्ररत्न
‘सिंघम’मधून जयकांत शिखरेच्या भूमिकेतून सर्वांना परिचित झालेला अभिनेता प्रकाश राजची हिंदी सिनेमातील गे्रटेस्ट व्हिलेनच्या यादीत नाव घेतले जाते. आता ते वडिलांच्या भूमिकेत पाहायला मिळतील. प्रकाश राज आता एक मुलाचे वडील झाले असून त्यांची पत्नी पोनी वर्मा यांनी एका गुटगुटीत बाळाला जन्म दिला आहे. ट्विटरवरून प्रकाश राज यांनी ही आनंदाची बातमी चाहत्यांशी शेअर केली. त्यांनी ट्विट केले की, ‘माझी पत्नी आणि मला पुत्ररत्नाचा लाभ झाला आहे. आमच्यासाठी सर्वात मोठ्या आनंदाची बातमी तुमच्याशी शेअर करताना मला खूप आनंद होत आहे. तुमचे आशीर्वाद आणि प्रार्थना आमच्या सोबत असोत. धन्यवाद!’पहिली पत्नी ललिता कुमारीला 2009 साली घटस्फोट देऊन प्रकाश राजने कोरिओग्राफर पोनी वर्माशी लग्न केले होते. पहिल्या लग्नापासून त्याला दोन मुली आहेत. तमिळ, तेलुगु, मल्याळम, कन्नड आणि हिंदी अशा पाच भाषांतील चित्रपटांतून त्याचा वावर आहे. अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक, वितरक अशा चौफेर व्यक्तिमत्त्वाचा धनी प्रकाश राजला मुलाच्या जन्माबद्दल खूप खूप शुभेच्छा.