Join us  

जे बात!! प्रभासच्या सिनेमाचा संपूर्ण सेट कोरोना रूग्णांसाठी दान केला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 11:52 AM

‘राधे श्याम’च्या मेकर्सचा मोठा निर्णय, सोशल मीडियावर होतेय कौतुक

ठळक मुद्दे‘राधे श्याम’ हा सिनेमा एक रोमॅन्टिक पीरियड ड्रामा आहे. राधाकृष्ण कुमार यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे.

भारतात कोरोनाची स्थिती भीषण आहे. रोज लाखो नवे रूग्ण सापडत आहेत आणि आरोग्य यंत्रणा पार कोलमडली आहे. अशास्थितीत फिल्म इंडस्ट्रीचे अनेक लोक मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. सुपरस्टार प्रभासच्या (Prabhas) ‘राधे श्याम’  (Radhe Shyam) या आगामी सिनेमाच्या मेकर्सनी असाच मदतीचा हात दिला. या मेकर्सनी काय मदत करावी तर कोट्यवधी रूपये खर्चून उभ्या केलेल्या सिनेमाच्या सेटवरची संपूर्ण प्रॉपर्टी एका प्रायव्हेट हॉस्पिटलला दान केली. (Prabhas starrer Radhe Shyam  filmmakers donate set property to a hospital)

प्रभास व पूजा हेगडे यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘राधे श्याम’ या सिनेमासाठी हॉस्पिटलचा एक शानदार सेट उभारण्यात आला होता. इटलीतील 70 च्या दशकातील हॉस्पिटल सिनेमात दाखवण्यात येणार आहे. त्यासाठी हा सेट तयार करण्यात आला होता़.  50 बेड्स, स्ट्रेचर्स, पीपीई किट्स, मेडिकल इक्विपमेंट्सपासून तर ऑक्सिजन सिलिंडरपर्यंत सर्व काही सेटवर होते. आता या सेटवरही ही सर्व प्रॉपर्टी कोव्हिड रूग्णांवरील उपचारासाठी हैदराबादेतील एका खासगी रूग्णालयाला दान देण्यात आली आहे.

 शूटींग पूर्ण झाल्यानंतर हॉस्पिटलच्या सेटवरचे सामान हटवण्यात आले होते आणि एका गोदामात भरून ठेवले गेले होते. मात्र कोरोना महामारीच्या या काळात बेड्स आणि अन्य सुविधांची कमतरता बघता, हे सर्व साहित्य दान करण्याचा निर्णय मेकर्सनी घेतला आणि 9 मोठ्या ट्रकमधून हे वैद्यकीय साहित्य एका खासगी रूग्णालयात पोहोचवण्यात आले. प्रभास आणि ‘राधे श्याम’च्या मेकर्सच्या या निर्णयाचे सोशल मीडियावर जोरदार कौतुक होत आहे.

‘राधे श्याम’ हा सिनेमा एक रोमॅन्टिक पीरियड ड्रामा आहे. राधाकृष्ण कुमार यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. तेलगू, तामिळ, कन्नड, मल्याळम आणि हिंदी भाषेत हा सिनेमा रिलीज होणार आहे. मैंने प्यार किया फेम अभिनेत्री भाग्यश्री या सिनेमात एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.

टॅग्स :प्रभास