Join us  

साहो या चित्रपटासाठी प्रभास अशाप्रकारे घेतोय मेहनत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 3:57 PM

प्रभासचा साहो या चित्रपटातील लूक देखील खूपच वेगळा असणार आहे आणि या लूकवर तो प्रचंड मेहनत देखील घेत आहे.

ठळक मुद्देप्रभासने कित्येक किलो वजन कमी केले असून तो त्यासाठी डाएट फॉलो करत आहे. एवढेच नव्हे तर तो जीममध्ये अनेक तास घाम देखील गाळत आहे. 

बाहुबली या चित्रपटाच्या दोन्ही भागांमुळे प्रभासला चांगलेच फॅन फॉलॉव्हिंग मिळाले आहे. दक्षिणेत सुपरस्टार असलेल्या प्रभासचे आज देशभरात नव्हे जगभर चाहते आहेत. बाहुबली या चित्रपटानंतर प्रभासचा कोणताच चित्रपट आला नसल्याचे त्याचे चाहते त्याच्या साहो याआगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत.

प्रभास त्याच्या या चित्रपटासाठी सध्या चांगलीच मेहनत घेत आहे. या चित्रपटात तो अ‍ॅक्शन सीन करताना दिसणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक सुजीत ही प्रत्येक अ‍ॅक्शन सीनकडे बारकाईने लक्ष देत आहेत. प्रत्येक सीनमध्ये प्रभास अतिशय प्रभावशाली दिसला पाहिजे यासाठी ते प्रयत्न करत आहेत.

प्रभासचा साहो या चित्रपटातील लूक देखील खूपच वेगळा असणार आहे आणि या लूकवर तो प्रचंड मेहनत देखील घेत आहे. या चित्रपटासाठी त्याने कित्येक किलो वजन कमी केले असून तो त्यासाठी डाएट फॉलो करत आहे. एवढेच नव्हे तर तो जीममध्ये अनेक तास घाम देखील गाळत आहे. 

ट्रान्सफॉर्मर फेम हॉलिवूडचे प्रसिद्ध स्टंट डायरेक्टर केनी बेट्स यांनी या चित्रपटातील अ‍ॅक्शन सीन दिग्दर्शित केले असून प्रभासच्या अ‍ॅक्शन दृश्यांवर ते प्रचंड खूश आहेत. या चित्रपटात अ‍ॅक्शन सीनचा भरणा आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही.  पाऊसात, धुळीत देखील त्यांनी अ‍ॅक्शन दृश्यं चित्रीत केली आहेत. तसेच या चित्रपटात कार चेसिंग, बाइक चेसिंग देखील प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. याचे चित्रीकरण इटली, अबू धाबी, हैदराबाद आणि मुंबई अशा विविध ठिकाणी करण्यात आले आहे. प्रत्येक अ‍ॅक्शन सीन खरा दिसावा यासाठी कित्येक तास आधी तालमी घेतल्या जात आहेत. 

साहो हा चित्रपट भारतातील पहिला बहुभाषी चित्रपट असून एकाच वेळी हिंदी, तेलगू आणि तमिळ या भाषांमध्ये हा शूट केला गेला आहे. या चित्रपटात प्रभाससोबतच श्रद्धा कपूर, नील नीतिन मुकेश, जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट 15 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.

 

टॅग्स :प्रभासश्रद्धा कपूर