सिद्धार्थ मल्होत्रा आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्या जेन्टलमॅनचे पोस्टर आऊट
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2017 11:28 IST
सिद्धार्थ मल्होत्रा आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्या आगामी चित्रपटाचे नाव आधी रिलोड असे सांगण्यात येत होते. मात्र आता या चित्रपटाचे ...
सिद्धार्थ मल्होत्रा आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्या जेन्टलमॅनचे पोस्टर आऊट
सिद्धार्थ मल्होत्रा आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्या आगामी चित्रपटाचे नाव आधी रिलोड असे सांगण्यात येत होते. मात्र आता या चित्रपटाचे नाव जेन्टलमॅन असे करण्यात आलेयं. नुकताच या चित्रपटाचा पोस्टर रिलीज करण्यात आला आहे. सिद्धार्थने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन हे पोस्टर रिलीज केले आहे. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये सिद्धार्थच्या एका हातात बंदूक तर दुसऱ्या हातात प्रेशर कुकरचे झाकण दिसतेय. हा एक एक्शन कॉमेडी चित्रपट आहे. जेन्टलमॅनमध्ये सिद्धार्थ गौरव नावाच्या मुलाची भूमिका साकारतोय तर जॅकलिन काव्या नावाच्या मुलीची. काव्या एका सुंदर, सुशील आणि आयुष्य़ात रिस्क घेणाऱ्या मुलाच्या शोधात असते. हा पहिला चित्रपट असेल ज्यात जॅकलिन आणि सिद्धार्थ एकत्र काम करत आहेत. याचित्रपटाचे दिग्दर्शन राज करतोय. 25 ऑगस्ट 2017ला जेन्टलमॅन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या सिद्धार्थ 'इत्तेफाक'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. इत्तेफाक हा 1969 साली आलेल्या राजेश खन्ना आणि नंदा यांच्या चित्रपटाचा रिमेक आहे. 1969 साली आलेल्या इत्तेफाकचे दिग्दर्शन दिगवंत निर्माते यश चोप्राने यांनी केले होते. इत्तेफाकच्या रिमेकचे दिग्दर्शन अभय चोप्रा करतोय. याची निर्मिती शाहरुख खानचे प्रोडक्शन रेड चिलीज आणि करण जोहरचे धर्मा प्रोडक्शन मिळून करतेय. या चित्रपटात अक्षय खन्ना आणि सोनाक्षी सिन्हा यांच्या ही महत्त्वाच्या भूमिका आहेत. सिद्धार्थ आणि सोनाक्षीचे जोडी पहिल्यांदाच या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय सिद्धार्थ नीरज पांडे दिग्दर्शित अय्यारीमध्ये सुद्धा मनोज वाजपेयीसह झळकणार आहे. काही दिवसांपूर्वीच सिद्धार्थने आपल्या ट्विटर अकांऊटवरुन या चित्रपटाचे फर्स्ट पोस्टर रिलीज केले होते. हा चित्रपट एका खऱ्या गोष्टीवर आधारित आहे.