‘आॅँखे २’ चे पोस्टर आउट !
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2016 10:11 IST
अक्षय कुमारच्या ‘आँखे’ चित्रपटाच्या सीक्वलच्या बाबतीत बऱ्याच दिवसापासून चर्चा होती. विपुल शहाच्या या चित्रपटाला चाहत्यांची खूपच दाद मिळाली होती ...
‘आॅँखे २’ चे पोस्टर आउट !
अक्षय कुमारच्या ‘आँखे’ चित्रपटाच्या सीक्वलच्या बाबतीत बऱ्याच दिवसापासून चर्चा होती. विपुल शहाच्या या चित्रपटाला चाहत्यांची खूपच दाद मिळाली होती आणि चित्रपट तसा खूप सुंदरही होता. यात अमिताभ आणि अक्षयची ट्यूनिंगदेखील जबरदस्त होती. या चित्रपटाच्या सीक्वलचे पहिले पोस्टर नुकतेच आउट झाले आहे. या पोेस्टरमध्ये अमिताभ बच्चनचे डोळे आणि तीन लोकांची सावली आहे. मात्र हे तीन जण कोण आहेत याचा खूलासा आज होणार आहे. अनीस बज्मीने वेलकम बॅक दरम्यान सांगितले होते की आॅँखेच्या सीक्वलवर काम सुरू आहे, मात्र चित्रपटासाठी अजून एकही चेहरा फायनल झाला नाही. मात्र आज चित्रपटाविषयी आज अधिकृत घोषणा केली जाईल. अगोदर या चित्रपटासाठी शाहिद कपूर आणि कॅटरिना कैफ फायनल झाल्याच्या बातम्या झळकल्या होत्या. त्यानंतर नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत असल्याच्या चर्चा होत्या. याविषयी अनीस बज्मीला विचारण्यात आले तर अमिताभ बच्चन शिवाय आॅँखे पूर्णच होऊ शकत नाही. या शिवाय त्या तीन कलाकारांविषयीदेखील आज १७ रोजी खूलासा होणार आहे. तर मग पाहूया कसा असेल आँखे २........