Join us  

1994 सालातील 'हे' लोकप्रिय गाणे नव्याने दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 4:37 PM

'नवाबजादे' चित्रपटात 1994 साली लोकप्रिय ठरलेले गाणे रिक्रिएट करण्यात आले आहे

ठळक मुद्दे'नवाबजादे'च्या निमित्ताने पुन्हा एकदा राघव जुयाल, पुनीत जे. पाठक, धर्मेश येलांडे व शक्ती मोहन ही चौकडी आली एकत्र ‘अम्मा देख तेरा मुंडा बिगडा जाये’ या गाण्याला लावला वेगळाच रॅपचा तडका

धर्मेश येलांडे, राघव जुयाल आणि पुनीत जे. पाठक यांचा 'नवाबजादे' चित्रपट सध्या चर्चेत आहे. हा चित्रपट 27 जुलैला प्रदर्शित होणार आहे. मात्र सिनेमातील गाणी लोकांच्या पसंतीस उतरत आहेत. या चित्रपटात 1994 साली लोकप्रिय ठरलेले गाणे रिक्रिएट करण्यात आले आहे. या गाण्याचे बोल आहेत ‘अम्मा देख तेरा मुंडा बिगडा जाये’. 

‘अम्मा देख तेरा मुंडा बिगडा जाये’ या गाण्याला एक वेगळाच रॅपचा तडका लावण्यात आला आहे. १९९४ मध्ये जॅकी श्रॉफवर चित्रीत झालेल्या या गाण्याची चाल पूर्ण बदलण्यात आली असून त्याचे चित्रीकरणही वेगळ्या पद्धतीने करण्यात आले आहे. 'नवाबजादे' चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा राघव जुयाल, पुनीत जे. पाठक, धर्मेश येलांडे आणि शक्ती मोहन ही चौकडी एकत्र आली आहे. या गाण्यात ही चौकडी धमाल करताना दिसत आहे. शक्तीने शिमरिंग सालसा ड्रेसमध्ये तिघांबरोबर या गाण्यात केमिस्ट्री दाखवून दिली आहे. गुरिंदर सैगल ऊर्फ सरदारजी आणि सुकृती कक्कर यांनी हे गाणे गायले असून सरदारजीनेच या गाण्याला संगीत दिले आहे. तर रॅपिंग इक्काने केले आहे.

 

जयेश प्रधानने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून रेमो डिसुझाने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. यापूर्वी आलेली ‘हाय रेटेड गबरू’ आणि ‘तेरे नाल नचणा’ ही दोन्ही गाणी सुपरहिट ठरली असून या नव्या गाण्याला कमी कालावधीत ४५ लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले असून सध्या हे गाणे ट्रेंडिंगमध्ये आहे. दरम्यान चित्रपटातील नायिका ईशा रिखीदेखील या गाण्यामध्ये थिरकताना दिसते आहे. या चित्रपटातील गाणी हिट ठरत आहेत. मात्र चित्रपट प्रेक्षकांना कितपत भावतो हे पाहावे लागेल.