Join us  

यांच्या तालावर थिरकायची दुनिया...! या आहेत बॉलिवूडच्या टॉप कॅब्रे डान्सर 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 8:00 AM

जुन्या हिंदी सिनेमांत आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेला 'कॅब्रे डान्स' सर्वानाच माहीत आहे...

बॉलिवूडचे बहुतेक जुने चित्रपट कॅब्रे डान्सशिवाय पूर्ण होत नसत. या काळात अनेक अभिनेत्रींनी कॅब्रे डान्सर म्हणून लोकप्रियता मिळवली. आज अशाच बॉलिवूडच्या लोकप्रिय कॅब्रे डान्सरबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

हेलन

कॅब्रे डान्स म्हटला की, बॉलिवूडचे एक नाव हमखास डोक्यात येते, ते म्हणजे हेलन यांचे. होय, सलमान खानची सावत्र आई हेलन. 1950-60 आणि 70 च्या दशकातील नाईटक्लब व कॅब्रे डान्स नंबर्सनी तर हेलनला भरपूर यश मिळवून दिले. त्याकाळात तिची तुलना मेरिलिन मनरो बरोबर केली जायची. 1958 साली वयाच्या 19 व्या वर्षी त्यांना पहिल्यांदा कॅब्रे डान्सर म्हणून रूपेरी पडद्यावर झळकल्या.

नादिरा

नादिरा म्हणजे बॉलिवूडे पहिली स्टंटवूमन.  मेरी इवन्स हीच पुढे नादिरा म्हणून ओळखली जाऊ लागली.   घट्ट कपडे, गुडघ्यापर्यंत येणारे शूज हा पेहराव तिची खासियत.  त्या काळात अनेक स्टंट तिने स्वत: केले. नादिरा बॉलिवूडची पहिली अ‍ॅक्शन गर्ल असली तरी ती कॅब्रे डान्सरही होती. ‘श्री 420’ मधील मूड मूड के न देख हे तिचे डान्स नंबर आजही लोकप्रिय आहे. 2006 मध्ये तिचे निधन झाले.

पद्मा खन्ना

पद्मा खन्नाला रामायण या मालिकेतील कैकयीच्या भूमिकेसाठी ओळखले जाते. पण सुरुवातीच्या काळात कॅब्रे डान्सर अशीच तिची ओळख होती. वयाच्या 12 व्या वर्षीच पद्मा खन्ना यांनी अभिनयाची कारकिर्द सुरु केली. 1961 मध्ये  भैय्या  या भोजपुरी सिनेमाद्वारे पद्मा यांनी आपल्या फिल्मी करिअरची सुरवात केली. पण त्यांना खरी ओळख मिळाली ती 1970 साली. होय, जॉनी मेरा नाम या चित्रपटात पद्मा यांना एक डान्स नंबर करण्याची संधी मिळाली आणि त्यांचा चेहरा सगळ्यांच्या नजरेत भरला. यानंतर पद्मा यांनी वेगवेगळ्या भाषेतील सुमारे 400 सिनेमांत काम केले. पण यापैकी बहुतेक सिनेमात त्यांना डान्सरच्याच भूमिका मिळाल्या. मग तो लोफर हा सिनेमा असो किंवा पाकिजा. 

बिंदू

70 च्या दशकात बिंदू यांनी अनेक आयटम नंबर्समध्ये काम केले. सुमारे 160 चित्रपटात काम करणाºया बिंदूंनी या गाण्यांनी खास ओळख दिली.

परवीन बाबी

आज आपल्यात नसलेली अभिनेत्री परवीन बाबीने अनेक सुपरहिट सिनेमे दिलेत. पण अनेक चित्रपटात कॅब्रे डान्सही केला.

अरूणा इराणी

अरूणा इराणी यांनीही बॉलिवूडला अनेक हिट कॅब्रे नंबर दिलेत.

आरती दास 

आरती दास यांचा  60 व 70 च्या दशकात बंगाली चित्रपटसृष्टीत मोठा बोलबाला होता. दिग्गज दिग्दर्शक सत्यजीत रे यांच्या प्रतिद्वंदी व सीमाबद्ध अशा सिनेमात त्यांनी काम केले. फिल्म इंडस्ट्रीत ‘क्वीन आॅफ कॅब्रे’ नावाने त्या प्रसिद्ध होत्या. 

टॅग्स :बॉलिवूड