Join us  

पूनम पांडेने शिकवला योगा, पण तिच्या सेक्सी अंदाजाचीच रंगली चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2019 4:30 PM

पूनम पांडेच्या फॅन पेजवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओत चक्क पूनम योगा शिकवताना दिसत आहे.

ठळक मुद्देया व्हिडिओत योगापेक्षा तिचा सेक्सी अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. पूनम पांडेच्या फॅन क्लबने हा व्हिडिओ पोस्ट केला असून या व्हिडिओची चांगलीच चर्चा रंगली आहे.

अभिनेत्री पूनम पांडे सोशल मीडियावरील बोल्ड फोटो आणि व्हिडिओंमुळे चर्चेत असते. तिचे हे फोटो आणि व्हिडिओ सोशल मी़डियावर नेहमीच व्हायरल होतात. ती स्वतः तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचे बोल्ड व्हिडिओ शेअर करताना दिसते. पूनम ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री नसली तरी प्रसिद्ध अभिनेत्री इतकेच फॅन फॉलोव्हिंग तिला आहे. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला 28 लाखांहून अधिक लोक फॉलो करतात. नुकताच पूनमच्या इन्स्टाग्रामवरील फॅन पेजवर शेअर करण्यात आलेला व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओला अनेकांनी आतापर्यंत लाईक केले असून यावर अनेक कमेंट देखील दिले आहेत. या व्हिडिओला अनेक व्ह्यूज मिळाले असून पूनमच्या याच व्हिडिओची सध्या सगळीकडे चर्चा आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार आहे.

पूनम पांडेच्या फॅन पेजवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओत चक्क पूनम योगा शिकवताना दिसत आहे. पण हा योगा पाहिल्यानंतर खरंच योगा अशाप्रकारे केला जातो का असा प्रश्न लोकांना पडत आहे. कारण या व्हिडिओत योगापेक्षा तिचा सेक्सी अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. पूनम पांडेच्या फॅन क्लबने हा व्हिडिओ पोस्ट केला असून या व्हिडिओची चांगलीच चर्चा रंगली आहे.

पूनम पांडेने नशा या चित्रपटाद्वारे तिच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटातील तिच्या अभिनयापेक्षा तिच्या सेक्सी अंदाजाची जास्त चर्चा रंगली होती. या चित्रपटाशिवाय ती शक्ती कपूरसोबत एका आयटम साँगवर थिरकली आहे. 

पूनम पांडे तिच्या काही वक्तव्यांमुळे चर्चेत आली होती. क्रिकेट मॅचेसची पूनम पांडे किती मोठी फॅन आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. भारताने क्रिकेटचा वर्ल्ड कप जिंकला तर मी कपडे उतरवेन असे म्हणत 2011 च्या वर्ल्ड कप मॅचच्यावेळी पूनमने फुकटची पब्लिसिटी मिळवली होती. सध्या वर्ल्ड कपचे सामने सुरू असून या सामन्यानंतर ती अनेकवेळा आपले फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करते. 

आयसीसी वर्ल्ड कप 2019 च्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या सामन्यात सर्वोत्तम कामगिरीची नोंद करणाऱ्या भारतीय संघाने विजय मिळवला होता. त्यावेळी तिने काळ्या रंगाच्या ट्रान्सपरन्ट कपड्यांमध्ये फोटो पोस्ट केला होता.  

टॅग्स :पूनम पांडे