Join us  

‘पद्मावत’ बघायला जाणाऱ्या पूनम पांडेला युजर्सनी, ‘दीदी.. पूर्ण कपडे परिधान करून जा’ असा दिला सल्ला !

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2018 12:55 PM

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा चित्रपट ‘पद्मावत’ रिलीजनंतरही वादग्रस्त ठरत आहे. कारण चित्रपटाला अजूनही सातत्याने विरोध होत असून, त्याबद्दल ...

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा चित्रपट ‘पद्मावत’ रिलीजनंतरही वादग्रस्त ठरत आहे. कारण चित्रपटाला अजूनही सातत्याने विरोध होत असून, त्याबद्दल कुठले ना कुठले विवादास्पद वक्तव्य समोर येत आहे. बॉलिवूड सेलिब्रिटीदेखील चित्रपटाबद्दल त्यांचे मत मांडत असून, काही सकारात्मक, तर काही नकारात्मक बोलताना दिसत आहेत. याचदरम्यान हॉट अभिनेत्री पूनम पांडे हिने ट्विट करून चित्रपटाबद्दल तिच्या मनात असलेले विचार मांडले. मात्र सोशल मीडियावर तिच्या या ट्विटचे चांगलेच हसू झाले. युजर्सनी तिची अक्षरश: खिल्ली उडविली. पूनमने ट्विटमध्ये लिहिले की, ‘आज पद्मावत बघायला जात आहे. हा टास्क रिअ‍ॅलिटी शो ‘खतरों के खिलाडी’सारखा असायला हवा.’ पूनमने हे ट्विट करताच युजर्सनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. एका युजरने पूनमची खिल्ली उडविताना लिहिले की, ‘ताई कपडे घालून जा’! एका अन्य युजरने लिहिले की, ‘दीदी, पूर्ण कपडे परिधान करून जा अन्यथा लोक ‘पद्मावत’ऐवजी भलतेच काही तरी बघायला सुरुवात करतील.’ आणखी एका युजर्सने लिहिले की, ‘बरं झालं असतं तुझा एखादा चित्रपट आला असता पोर्नावत... तेव्हा खिलजीसह सर्वांनीच एकत्र बसून बघितला असता’, तर एका युजर्सने लिहिले की, ‘चित्रपट बघायला जात आहेस परंतु खिलजीपासून सावध राहा. अन्यथा तो तुलाच उचलून घेऊन जाईल.’ तसेच एकाने लिहिले, ‘सेफ्टी कव्हर घालून जा, जेणेकरून करणी सेना तुझ्यावर काही करणी करणार नाहीत.’