Join us  

शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्राच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात पूनम पांडेची धाव, केले गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2020 12:10 PM

पूनम पांडे अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्रा आणि त्याचा पार्टनर सौरभ कुशवाहा यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात पोहचली आहे.

अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे हिने अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा आणि बिझनेसमन राज कुंद्रावर व्हिडीओ चोरल्याचा आरोप केला आहे. न्याय मिळवण्यासाठी तिने मुंबई उच्च न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. तिने सांगितले की, राज कुंद्रा आणि त्याचा भागीदार सौरभ कुशवाहाची कंपनी आर्म्सप्राइम मीडियाने डील संपल्यानंतरही तिचा कंटेट चोरला आहे. 

अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे हिने बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्रा आणि त्याचा पार्टनर सौरभ कुशवाहा यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. पूनम पांडेने आरोप केले आहेत की, राज कुंद्रा आणि त्यांच्या कंपनीने बेकायदेशीररित्या तिचा व्हिडीओ आणि फोटोचा वापर केला आहे. पूनमने आरोप केला आहे की, या कंटेटचा वापर दोघांमधील कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर केला आहे.

मात्र राज कुंद्रा आणि सौरभ कुशवाहाने पूनमचे आरोप फेटाळून लावले आहेत आणि म्हटले की त्यांना कोणत्याही प्रकारची नोटीस मिळाली नाही. खरेतर पूनम पांडेने राज कुंद्रा आणि त्याचा पार्टनर सौरभ कुशवाहाची कंपनी आर्म्सप्राइम मीडियासोबत एक डील साइन केली होती. ही कंपनी पूनम पांडेचा अॅप सांभाळत होती. पूनमने दावा केला आहे की, दोघांमधील ही डील आठ महिन्यांपूर्वी संपली होती. पण कंपनीने त्यानंतरही कंटेटचा वापर केला आहे. 

पूनम पांडेने आरोप केले आहेत की, राज कुंद्रा तिच्या कंटेटचा वापर करून पैसे कमवत आहे. मागील सहा महिन्यांपासून काही लोक कॉल करून अश्लील बोलत आहेत. आर्म्सप्राइम कंपनी माझे अॅप सांभाळत होती. मी कॉन्ट्रॅक्ट फार कमी वेळासाठी ठेवले कारण त्यात फसवणूकीसारखे वाटले होते. काही कालावधीनंतर मी कॉन्ट्रॅक्ट संपवले. त्यानंतरही मागील ८ महिन्यांपासून ते माझे व्हिडीओ चोरत आहेत. मी राजला कॉल, मेसेज आणि मेल करून व्हिडीओ चोरण्यास मनाई केली.

पूनम पांडे पुढे म्हणाली की, पण आता मला धमकी मिळते आहे. मला जाणून घ्यायचे आहे की ते माझे व्हिडीओ का चोरत आहेत. जर ते कोणत्या आर्थिक तंगीतून जात आहेत तर मी त्यांच्यासाठी पैसे जमवून देऊ शकते पण माझा कंटेट चोरू नका. हे प्रकरण आता हायकोर्टात गेले आहे. माझी बाजू मजबूत आहे. माझ्याकडे सर्व पुरावे आहेत. मला न्याय मिळावा, यासाठी मी धडपडत आहे आणि मला माहित आहे हे प्रकरण मीच जिंकू शकते.

टॅग्स :पूनम पांडेराज कुंद्राशिल्पा शेट्टी