Join us  

या अभिनेत्रीने अशी सोडली दारू, सोशल मीडियावर दिला व्यसनमुक्तीचा मंत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2019 12:19 PM

ती वडिलांसारखीच बिनधास्त. या स्वभावामुळे ती अनेकदा वादात सापडली. पण तिने ना जगाची पर्वा केली, ना वादांची.

ठळक मुद्दे पूजा भट्टने ‘सडक’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. त्यात संजय दत्तही मध्यवर्ती भूमिकेत होता.

ती वडिलांसारखीच बिनधास्त. या स्वभावामुळे ती अनेकदा वादात सापडली. पण तिने ना जगाची पर्वा केली, ना वादांची. बॉलिवूड अभिनेत्री म्हणून ती नावारूपास आली. पण हे यश फार काळ टिकले नाही आणि ती दारूच्या आहरी गेली. मग काय, तिचे चित्रपट नाही तर दारूचे किस्से चर्चेत राहायला लागले. आम्ही कुणाबद्दल बोलतोय ते एव्हाना तुमच्या लक्षात आलेच असेल. होय, महेश भट यांची मुलगी पूजा भट हिच्याबद्दल.सध्या पूजा भट्ट आगामी ‘सडक 2’ चित्रपटामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अनेक वर्षांनंतर या चित्रपटाद्वारे ती कमबॅक करतेय.  अशात पूजाने दारूच्या व्यसनाविरुद्धची लढाईचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे.

 एकेकाळी पूजा  दारूच्या पूर्णपणे आहारी गेली होती. पण २०१६ मध्ये तिने दारूचे व्यसन सोडले. पण हे सोपे नव्हते.  दारूच्या व्यसनातून मुक्ती मिळाल्यानंतर आता तीन वर्षांनी तिने या अनुभवावर चाहत्यांसोबत एक पोस्ट शेअर केली आहे.  ती लिहिते, ‘उद्याची सकाळ कुणी पाहिली? दोन वर्ष आणि दहा महिन्यांनंतर आता त्याबद्दल सांगण्याची वेळ आली आहे. वाईट सवयी सोडण्याचा प्रयत्न करत असाल, तुमच्या आत लपलेल्या राक्षसाला नमवण्याचा प्रयत्न करत असाल तर  या लढाईत तुम्ही एकटे नाहीत.  मी हे करू शकते तर तुम्हीही नक्कीच हे करू शकता. हे करताना अनेक अडचणी येतील मात्र नैराश्य येऊ देऊ नका.  चिकाटीने आणि ईषेर्ने चालत राहा. तुम्हाला यश नक्की मिळेल.’

 पूजा भट्टने ‘सडक’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. त्यात संजय दत्तही मध्यवर्ती भूमिकेत होता. आता ‘सडक’चा सीक्वल ‘सडक 2’ प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. यात  पूजासोबतच आदित्य रॉय कपूर आणि आलिया भट यांच्याही चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.

 

टॅग्स :पूजा भटमहेश भट