कुठलीही महिला स्वच्छ मन आणि बुद्धीने आपले मत मांडते तेव्हा तिचा संताप बोलतोय, असेच समाजाला वाटते. अगदी मी बोलते त्याच अंदाजात महेशजी ( पूजाचे वडिल महेश भट्ट) बोलतात. पण माझे बोलणे लोकांना असभ्य वाटते. याऊलट महेशजी किती इंटेंस बोलतात, असे लोक म्हणतात. माझ्यासारखी थोडी फार सुंदर महिला तिच्या सेक्शुअॅलिटीसोबत कम्फर्टेबल असते, स्वत:ची मते मांडते, तेव्हा लोकांना ती अहंकारी वाटते. महिलांना केवळ ग्लॅमर पोजमध्ये आणि भोळ्या-भाबळ्या रूपातच पाहणे समाजाला आवडते. भारत एक विचित्र देश आहे. कुठलीही बाई लक्ष्मी, सीता, सावित्री बनून राहत असेल तर ती समाजाला हवी आहे. पण तिने कालीचे रूप धारण केले की, लोकांना त्रास व्हायला लागतो, असेही पूजा म्हणाली.
मी आयुष्यात पूर्वापार माझ्या स्वत:च्या अटींवर जगले आहे. पुढेही असेच जगणार. लोकांनी मला सहन करो, न करो. मला फॉलो करो ना करो. पण मी विचार करणार, माझे विचार व्यक्त करणार आणि जशी आहे तशीच राहणार. हे माझे व्यक्तिमत्त्व आहे आणि माझे पिता महेश भट्ट यांच्याकडून वारसारूपात मला मिळाले आहे, असेही तिने स्पष्ट केले.
ALSO READ : महेश भट्ट सांगतायेत, या गोष्टीचा पूजा भट्टला झाला होता पश्चाताप
महेश भट्ट यांची थोरली मुलगी असलेल्या पूजाला १९९१ साली प्रदर्शित झालेल्या ‘दिल है के मानता नहीं’ या चित्रपटाने अपार प्रसिद्धी मिळवून दिली. त्यानंतर ‘सडक’, ‘फिर तेरी कहानी याद आयी’, ‘चाहत’ या चित्रपटात ती दिसली. त्यानंतर मात्र दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रात तिने स्वत:ला झोकून दिले.