Join us  

"मला जीवे मारण्याच्या धमक्या मिळतात", पूजा भट्टने पोस्ट शेअर करत व्यक्त केला संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 1:21 PM

इन्स्टाग्रामपेक्षा ट्व‍िटरच्या गाईडलाईन्स खूप चांगल्या आहेत.

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूड नेपोटीझम अशा अनेेक गोष्टींवर वाद रंगत आहेत. महेश भट्टनंतर  आलिया भट्ट, पूजा भट्ट यांच्यावरही सोशल मीडियावर नेटीझन्स संताप व्यक्त करताना दिसतात. सडक सिनेमाला रसिकांनी नापसंती दर्शवत त्यांचा रागही दाखवून दिला. त्यानंतर पुजा भट्टने सोशल मीडियावर खोचक वाद ओढवून घेतला होता. आता पुन्हा पूजा भट्टने एक फोटो शेअर करत संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडियावमुळे तिच्या जीवाला धोका असल्याचे तिने सांगितले आहे. वारंवार तक्रार करूनही अपेक्षित पाऊल उचलली गेली नाहीत. त्यामुळे पूजा भट्टचा पारा चांगलाच चढला आहे. तिने म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून मला जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. लोक मला मारून टाकण्यासाठी सर्रास धमकी देत आहेत.

कदाचित इंस्टाग्रामसाठी एक सामान्य गोष्ट असावी. जेव्हा मी अशा गोष्टींना आळा बसावा यासाठी त्यांच्याकडे तक्राकर केली तर त्यांनी माझी मदत न करता याउलट मलाच संबंधीत व्यक्तींना ब्लॉक करण्याचा सल्ला देण्यात आला. यावर त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे नियम अटी नाहीत. यांच्यापेक्षा ट्विटर परवडलं, आक्षेपार्ह गोष्टींना आळा बसवण्यासाठी त्यांच्याकडे वेगेळ नियम आहेत. इन्स्टाग्रामपेक्षा ट्व‍िटरच्या गाईडलाईन्स खूप चांगल्या आहेत.

पूजाने आणखी एक ट्वीट केले, ज्यामध्ये तिने लिहिले आहे की, मला रोज असे मेसेज येतात, ज्यात मी मरत का नाही? स्वतःला मारून का टाकत नाही? असे माझ्याच विषयी तिरस्कार करणारे शब्द मला वाचायला मिळतात. मेसेज करणा-यांमध्ये महिलांचाही समावेश असल्याची शक्यता आहे. कदाचित या महिला नसतीलही, महिलेचे सोगं घेत अनेक बनावट प्रोफाईद्वारे मला त्रास दिला जात असल्याची शंका पुजा भट्टने बोलून दाखवली आहे. एखाद्याला असे जीवे मारण्याची धमकी देणे हा एक सायबर गुन्हा आहे. 

असा प्रकार हा पूजा भट्टशिवाय इतर अभिनेत्रींबरोबरही घडला होता.सोनम कपूरची बहीण रिया कपूरलाही अशाप्रकारे सोशल मीडियावर जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या. यावर तिनेही इन्स्ट्रागामला तक्रार केली होती. मात्र त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची ठोस पाऊलं उचलली गेली नव्हती. त्यामुळे नाराज झालेली रियानेही इन्स्ट्राग्रामला फटकारले होते.

टॅग्स :पूजा भट