Join us  

Pooja Bedi: 'मला यातून काहीही करुन...' पूजा बेदीनं अनेक वर्षांनी केला घटस्फोटाबाबत 'तो' खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2023 4:42 PM

घटस्फोट घेतल्यानंतर पूजाला तिच्या भविष्याची आणि करिअरची खूप चिंता होती, पण...

बॉलिवूडची अभिनेत्री पूजा बेदी तिच्या चित्रपटांव्यतिरिक्त तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही बोलत असते. अभिनेत्रीने फरहान फर्निचर वाले यांच्याशी लग्न केले होते, परंतु त्यांचं लग्न अयशस्वी ठरले आणि दोघे वेगळे झाले. आता अलीकडेच, अनेक वर्षांनी घटस्फोटानंतर तिला कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागले, याबद्दल पूजाने सांगितले.

विशेष म्हणजे अभिनेत्री पूजाच्या घटस्फोटाला बरीच वर्षे उलटून गेली आहेत. घटस्फोट घेतल्यानंतर पूजाला तिच्या भविष्याची आणि करिअरची खूप चिंता होती. दोघांनी 1994 मध्ये लग्न केले आणि 2003 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.

अलीकडेच एका मुलाखतीत पूजाला विचारण्यात आले होते की घटस्फोट घेतल्यानंतर आयुष्याची सुरुवात कशी केलीस, कारण तिने पोटगी मागितली नव्हती. यावर अभिनेत्री म्हणाली, माझ्या मनात असे काही आले नव्हते की मला त्याच्याकडून कोणत्याही प्रकारची पोटगी घ्यायची आहे. 

अभिनेत्री पुढे म्हणाली, 'मला या लग्नातून बाहेर पडायचे होते. त्यामुळे मला यातून काहीही करुन बाहेर पडायचे होते. जिथे इच्छा असते तिथे मार्ग असतो. घटस्फोटानंतर अनेक समस्या आल्या, पण या समस्यांवर उपाय शोधण्यावरच मी माझे सर्व लक्ष केंद्रित केले होते. नंतर माझ्या मुलांशी मी मैत्री केली जेणेकरून त्यांच्यावर या सगळ्याचा कोणत्याही चा परिणाम होऊ नये. महिलांनी पुढे येऊन स्वत:चा निर्णय घेण्याची गरज आहे आणि समाजाची अजिबात चिंता करू नये.

पूजा पुढे म्हणाली, 'घटस्फोट ही समाज आणि कुटुंबासाठी अजूनही मोठी गोष्ट आहे, परंतु आपण हे समजून घेतले पाहिजे की जर आपण नातेसंबंधात आनंदी नसलो तर आपण त्यातून बाहेर पडायला हवे कारण आयुष्य खूप मोठे आहे आणि आपण आनंदाने जगले पाहिजे..'

टॅग्स :पूजा बेदीघटस्फोट