Join us  

Corona Virus : अभिनेत्री पूजा बेदी कोरोना पॉझिटीव्ह, भावी पती व मोलकरणीलाही झाली लागण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 10:17 AM

Pooja Bedi tests Covid-19 positive : पूजा बेदीने आत्तापर्यंत कोरोना लसीचा एकही डोस घेतलेला नाही. किंबहुना लस घेण्याचा तिचा इरादाही नाही.

ठळक मुद्देपूजा बेदीने यावर्षी जानेवारी महिन्यात कोव्हिड लसीवर आक्षेप नोंदवला होता. पीफाइजर कंपनी आणि डब्ल्यूएचओला टॅग करत तिने कोव्हिड19 लसीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

कोरोनाचा (Corona Virus ) जोर कमी झालाये, पण धोका अद्याप टळलेला नाही. पहिल्या व दुस-या लाटेत बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी कोरोनाच्या विळख्यात सापडले होते. आता कोरोना रूग्णांचे प्रमाण कमी झाले असताना पुन्हा एकदा बॉलिवूडकरांसाठी काहीसी शॉकिंग बातमी आहे. होय, अभिनेत्री पूजा बेदी (Pooja Bedi ) कोरोना पॉझिटीव्ह (Pooja Bedi tests Covid-19 positive) आढळली आहे. तिच्यासोबत तिचा भावी पती आणि तिची मोलकरीण यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.पूजा बेदीने आत्तापर्यंत कोरोना लसीचा एकही डोस घेतलेला नाही. किंबहुना लस घेण्याचा तिचा इरादाही नाही. पूजाने स्वत: ती कोरोना पॉझिटीव्ह असल्याची माहिती दिली आहे.इन्स्टाग्रामवर पूजा बेदीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. कोव्हिडी पॉझिटीव्ह!! अखेर मी कोव्हिड पॉझिटीव्ह झालेच. मी लस न घेण्याचा निर्णय घेतला आहे. कारण माझी नैसर्गिक रोगप्रतिकार शक्ती, पर्यायी उपचार व आरोग्यवर्धक सवयींमुळे मी बरी व्हावी, अशी माझी इच्छा आहे आणि हा माझा व्यक्तिगत निर्णय आहे, असे हा व्हिडीओ शेअर करताना पूजा बेदीने लिहिले आहे.

व्हिडीओत तिने तिच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे. सुरूवातीला मला अ‍ॅलर्जी आहे, असे वाटले. मी साफसफाई केली होती आणि धुळीने अ‍ॅलर्जी  आणि त्यामुळे खोकला झाल्याचे वाटले. यानंतर ताप आला. आता माझी कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. ज्या लोकांनी कोरोना लस घेतली नव्हती, त्यापैकी 99 टक्के लोक बरे झालेत. ज्यांनी लस घेतली, त्यांच्यापैकीही 99 टक्के लोक बरे झालेत. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे. घाबरून जाण्याची नाही, असे तिने व्हिडीओत म्हटले आहे. कोरोना पॉझिटीव्ह आढळल्यानंतर तिने तिच्या आहाराबद्दलही माहिती दिली आहे. ऊसाचा रस, काढा, ताजी फळे, स्टीमसाठी कार्बोल टॅबलेट अशा वस्तू तिने व्हिडीओत दाखवल्या आहेत.पूजा बेदीने यावर्षी जानेवारी महिन्यात कोव्हिड लसीवर आक्षेप नोंदवला होता. पीफाइजर कंपनी आणि डब्ल्यूएचओला टॅग करत तिने कोव्हिड19 लसीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मी लस घेतली तर मी मास्क वापरणे बंद करू शकते का? लस घेतली तर सर्व व्यवहार सामान्यपणे करू शकते का? असे सवाल उपस्थित करत तिने या सर्व प्रश्नांची उत्तर नकारार्थी असल्याचे म्हटले होते. कदाचित कोव्हिड 19 लसीचा फायदा होईलही आणि कदाचित नाही, असेही तिने म्हटले होते. 

टॅग्स :पूजा बेदीकोरोना वायरस बातम्या