Join us  

वयाच्या ४७ व्या वर्षी पूजा बेदी अडकणार लग्नबंधनात, साखरपुड्याचे फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2019 9:00 PM

अभिनयापेक्षा आपल्या फटकळ वक्तव्यांमुळे अन् पर्सनल लाइफमुळेच ती अधिक चर्चेत राहिली आहे.

पूजा कायम तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत असते. सध्या पूजा  व मैनेकच्या नात्याची चर्चा जोरात होती. अखेर पूजाने मैनेकसह नुकताच साखरपुडा केला आहे. 2003 साली पूजाने पहिला पती फरहान फर्नीचरवालाशी काडीमोड घेत वेगळी झाली होती. पूजाच्या पहिला घटस्फोटाला आता 16 वर्ष झाली आहेत. पूजा व मैनेक दोघेही लॉरेन्स स्कूल सोनावरमध्ये एकत्र शिकले आहेत.

 

अर्थात मैनेक हा पूजाचा सीनिअर होता. शाळेच्या त्या दिवसांत तीन वर्षे सीनिअर असलेल्या मैनेकसोबत पूजा कधीच बोलली नाही. पण अलीकडे व्हाट्सअ‍ॅप ग्रूपच्या माध्यमातून मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाली आणि आता त्यांनी त्याच्या नात्याला नवीन ओळख देण्याचे ठरवले आहे. तुर्तास साखरपुडा झाला असला तरी लग्नाची तारिख अजुन समोर आलेली नाही. 

पूजा आणि फरहान यांना दोन मुले आहे. घटस्फोटानंतर पूजाची अनेक अफेअर गाजली. तिचे कोरिओग्राफर हनिफ हिलाल आणि अभिनेता आकाशदीप सेहगल यांच्या सोबतचे प्रेमप्रकरण तर चांगलेच गाजले होते. अभिनयापेक्षा आपल्या फटकळ वक्तव्यांमुळे अन् पर्सनल लाइफमुळेच ती अधिक चर्चेत राहिली आहे.४८ वर्षीय पूजा तब्बल पाच पुरुषांबरोबर रिलेशनशिपमध्ये  होती, मात्र अखेर मैनेकसह लग्न करत आपल्या आयुष्याची नवी सुरूवात करणार आहे. 

या जाहिरातीमुळे पूजा बेदी अडकली होती वादात

पूजा बेदी 'जो जिता वही सिकंदर' या चित्रपटात झळकली होती. या चित्रपटातील तिने साकारलेली भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. पूजा बेदी ही बोल्ड अॅक्टरेर्स म्हणूनच ओळखली जाते. पूजा बेदी आणि वाद यांचे खूपच जवळचे नाते आहे. १९९१ मध्ये पूजावर चित्रीत झालेल्या एका जाहिरातीमुळे तर चांगलाच वाद निर्माण झाला होता. तिने कामसूत्र कंडोमच्या जाहिरातीत काम केले होते. या जाहिरातील तिच्या मादक अदांची चांगलीच चर्चा रंगली होती. या जाहिरातीला दूरदर्शनवर दाखवण्यास बंदी होती. तसेच इतर वाहिनींनी देखील ही जाहिरात प्रक्षेपित करण्यास मनाई केली होती.