Join us  

सुशांत सिंग राजपूत आत्महत्याप्रकरणाला लागले नवीन वळण, ट्विटरवरून पोलीस गोळा करणार ही माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 3:07 PM

अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात एक नवीन ट्विस्ट समोर आले आहे.

अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात एक नवीन ट्विस्ट समोर आले आहे. लवकरच पोलिस ट्विटरला पत्र देणार आहेत.  पोलिसांना संशय आहे की, गेल्या काही महिन्यांपासून सुशांत सिंग राजपूत तिच्या पोस्ट डिलीट केल्याचा संशय आहे. एबीपी न्यूजच्या रिपोर्टनुसार, पोलिस जसा-जसा या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत तसे नवे नवे पेच त्यांच्यासमोर निर्माण होतायेत.  

पोलिस या प्रकरणाचा तपास जलद गतीने करतायेत. पोलिसांचा तपास आता सुशांतच्या सोशल मीडियावर पोहोचला आहे. सुशांतने पोस्ट डिलीट केल्याच्या संशयावरुन पोलिसांनी ट्विटरला चिठ्ठी पाठवली आहे. पोलिसांनी आतापर्यंत 22 लोकांचा जबाब नोंंदवला आहे. आता संशयाची सुई सुशांतच्या ट्विटर अकाऊंटवर जाऊ थांबली आहे. सुशांतच्या पोस्टमॉर्टमनुसार त्याच्या मृत्यूचे कारण गळफास घेतल्यामुळे गुदमरल्याने झाल्याचे सांगण्यात आले आहे. 

नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हॉट्सअॅपवरून देखील हा व्हिडिओ फॉरवर्ड केला जात आहे. या व्हिडिओतून असा दावा केला जात आहे की, 14 जून रोजी सकाळी 9.30 वाजेपर्यंत सुशांत प्ले स्टेशनवर गेम खेळत होता.या व्हिडिओच्या माध्यमातून असा प्रश्न विचारला जात आहे की, जो माणूस गेम खेळत होता, तो नैराश्याने आत्महत्या कशी काय करेल? हे कसे शक्य आहे? असे अनेक प्रश्न सोशल मीडियावर विचारण्यात येत आहेत.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूत