ओमपुरी यांच्या मृत्यूची पोलीस करणार चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2017 19:18 IST
ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचा शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या ६६ व्या वर्षी निधन झाले. त्याच्या अशा अचानक मृत्यूने हळहळ ...
ओमपुरी यांच्या मृत्यूची पोलीस करणार चौकशी
ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचा शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या ६६ व्या वर्षी निधन झाले. त्याच्या अशा अचानक मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या शरिराचे पोस्टमार्टम झाल्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. मात्र ओम पुरी यांचा मृत्यू संदेहास्पद असल्याने या प्रकारणाची चौकशी केली जाणार असल्याची माहिती पोलिसांच्या सूंत्रांनी दिल्याची सध्या चांगलीच चर्चा होत आहे. ओम पुरी यांचे निधन झाल्यावर त्यांच्या घराचा पंचनामा करण्यात आला. ओमपुरी यांचा मृत्यू नैर्सगिक मानला जात असला तरी पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या डोक्याच्या मागील बाजूवर दुखापत झाली आहे. ही दुखापत पडल्यामुळे झाली की मारल्यामुळे याची चौकशी करण्यात येणार आहे. ओम पुरी अतिशय जास्त मद्यपान करीत होते, त्यांच्या घरून दारूच्या बाटल्या मिळाल्या आहेत, कालही त्यांनी मद्यपान केले होते अशी माहिती देण्यात आली आहे. ‘आम्ही सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करणार आहोत, सोबतच त्यांच्याकडे येणाºया-जाणाºयाची चौकशी केली जाणार आहे, गरज पडल्यास पत्नी नंदिता पुरी यांची देखील चौकशी केली जाईल असे पोलिसांनी सांगितले. ओम पुरी यांच्या मृत्यूच्या आदल्या रात्री निर्माता खालिद रिझवी त्यांच्यासोबत होते, त्यांचा बयान पोलिसांनी नोंदविला आहे. खालिद रिझवी यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार; ‘संध्याकाळी मला फोन करून ओम पुरी यांनी घरी बोलावले. मी काल संध्याकाळी साडेपाच वाजता ओम पुरी यांच्या घरी गेलो होतो. तिथे त्यांची मुलाखत सुरू होती. मुलाखत संपल्यानंतर ओम पुरींनी मला एका कार्यक्रमाला जायचे असल्याचे सांगितले. त्यांनी मला सोबत यावे असे ते म्हणाले, मात्र मी नकार दिल्यावर पुरींनी गाडीने सोडण्यास सांगितले. त्यानंतर पहिल्यांदा ते ‘त्रिशूल’ या त्यांच्या घरी गेले, जिथे नंदिता पुरी राहतात. तेथे पत्नी नंदितासोबत त्यांचे भांडण झाले. ते मुलगा इशांतला भेटण्यासाठी गेले होते. खाली येऊन त्यांनी इशांतला कॉल केला, पण तो कोणत्यातरी पार्टीत होता. त्यानंतर ते गाडीतच त्याची वाट पाहू लागले. यादरम्यान त्यांनी पुन्हा मद्यपानही केलं. यानंतर आम्ही मनोज पहवाच्या घरी गेलो. तिथेही पैशांवरून त्याचा वाद सुरू होता. मी बाहेर होतो, त्यामुळे ते कोणाशी भांडत होते, हे मला माहित नाही. ते बाहेर आले तेव्हा फारच भावूक झाले होते. त्यानंतर मी त्यांना सोडले. पण कारमध्ये त्यांचं पाकिट पडले होते. फारच उशिर झाल्याने त्यांचे पाकिट परत करण्यासाठी ड्रायव्हरला सकाळी त्यांच्याकडे पाठवले. पण ते दरवाजा उघडत नसल्याचं ड्रायव्हरने सांगितले. खालिद रिझवी यांनी दिलेल्या माहितीमुळे ओम पुरी यांचा मृत्यूबाबत चौकशी करावी असे पोलिसांना वाटू लागले आहे.