Join us  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बायोपिक ५ एप्रिललाच होणार प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 2:45 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा 'पीएम नरेंद्र मोदी' १२ एप्रिलला प्रदर्शित होणार होता. मात्र आता या सिनेमाची डेट पुन्हा एकदा बदलण्यात आली आहे.

ठळक मुद्दे हा सिनेमा आता ५ एप्रिलला रिलीज होणार आहेया चित्रपटाचे दिग्दर्शन ओमंग कुमारने केले आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारित  सिनेमा 'पीएम नरेंद्र मोदी' १२ एप्रिलला प्रदर्शित होणार होता. मात्र आता या सिनेमाची डेट पुन्हा एकदा बदलण्यात आली आहे. हा सिनेमा आता ५ एप्रिलला रिलीज होणार आहे. या सिनेमात पीएम मोदींची भूमिका विवेक ऑबेरॉय दिसणार. या चित्रपटाचे दिग्दर्शन ओमंग कुमारने केले आहे. निर्मात्यांनी सांगितले की लोकग्रास्तव हा सिनेमा एक आठवडाआधी रिलीज करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. याआधी हा सिनेमा ५ एप्रिलचा रिलीज होणार होता. मुंबईतल्या भागामध्ये या सिनेमाचे शेवटच्या टप्पांमधलं शूटिंग सुरु आहे.  

मोदींच्या जीवनातील विविध टप्पे दाखवणारे नऊ लूक दाखवणारे फोटो काही दिवसांपूर्वी व्हायरल झाले आहेत. जवळपास सात ते आठ तासाचा कालावधी त्याला मेकअपसाठी लागतो. त्यानंतर सकाळी ८ वाजता बरोबर तो शूटिंगसाठी सेटवर हजर असतो. प्रोस्थेटिक मेकअपमुळे शुटिंग दरम्यान विवेकला काहीच खाता येत नाही. जे काही सेवन करायचं असतं ते फक्त द्रव्यरुपातलं खाणं विवेक खाऊ शकतो. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकमध्ये मोदींच्या भूमिकेत विवेक ऑबेरॉय दिसणार आहे. तर अमित शाह यांच्या भूमिकेत अभिनेता मनोज जोशी तर मोदींची आई हिराबेनच्या भूमिकेत जरीना वहाब दिसणार आहे. त्यांची पत्नी जशोदाबेन यांची भूमिका अभिनेत्री बरखा बिष्ट सेनगुप्ता निभावणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ओमंग कुमार करत आहेत. नरेंद्र मोदी यांचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर पाहणे औत्सुकतेचे ठरणार आहे. 

टॅग्स :विवेक ऑबेरॉयनरेंद्र मोदी