Join us  

Meme Viral : ‘पीएम नरेंद्र मोदी’ला स्थगिती! सोशल मीडियाने घेतली विवेक ओबेरॉयची फिरकी!!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2019 10:20 AM

अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर बेतलेल्या ‘पीएम नरेंद्र मोदी’ या बायोपिकच्या प्रदर्शनाला  निवडणूक आयोगाने स्थगिती दिली. निवडणूक आयोगाच्या या निकालानंतर सोशल मीडियावर ‘पीएम नरेंद्र मोदी’ ट्रेंड होऊ लागला.

ठळक मुद्देविवेक ओबेरॉय या चित्रपटात पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका साकारत आहे.

अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर बेतलेल्या ‘पीएम नरेंद्र मोदी’ या बायोपिकच्या प्रदर्शनाला  निवडणूक आयोगाने स्थगिती दिली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट प्रदर्शित झाल्यास भाजपाला झुकते माप मिळू शकते, असे निरीक्षण नोंदवत निवडणुकीत सर्व पक्षांना समान संधी मिळावी यासाठी आयोगाने चित्रपटाच्या प्रदर्शनाला लोकसभा निवडणूक काळापर्यंत स्थगिती दिली. निवडणूक आयोगाच्या या निकालानंतर सोशल मीडियावर ‘पीएम नरेंद्र मोदी’ ट्रेंड होऊ लागला. सोशल मीडियावर ‘पीएम नरेंद्र मोदी’मध्ये मुख्य भूमिका साकारणा-या विवेक ओबेरॉयला लक्ष्य केले गेले. त्याच्यावर  मीम्स बनवत, युजर्स त्याची खिल्ली उडवताना दिसले.निवडणूक आयोगाने विवेक ओबेरॉयचा अभिनय पाहिला आणि तो न आवडल्याने या चित्रपटावर थेट स्थगिती आणली, अशी मजेशीर प्रतिक्रिया एका युजरने दिले.

‘पीएम नरेंद्र मोदी’ला स्थगिती मिळाल्यानंतर विवेक ओबेरॉयवर ‘चौकीदारा’ची नोकरी शोधण्याची वेळ आली आहे, असे एका युजरने लिहिले.अनेकांनी विवेकला २०२४ मध्ये राहुल गांधींच्या बायोपिकमध्ये काम करण्याचा सल्लाही दिला.

विवेक ओबेरॉय या चित्रपटात पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका साकारत आहे. विवेकसोबतच या चित्रपटात बरखा बिश्त जशोदाबेन तर अभिनेते मनोज जोशी हे अमित शाह यांच्या भूमिकेत आहेत. याशिवाय बमन इराणी, झरीना वहाब, सुरेश ओबेरॉय आणि प्रशांत नारायणन यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. 

एकापेक्षा एक भन्नाट असे हे मीम्स तुम्हीही पाहायलाच हवेत...

 

टॅग्स :पी. एम. नरेंद्र मोदीविवेक ऑबेरॉय