Join us  

‘पीएम नरेंद्र मोदी’शी आम्हाला काहीही देणेघेणे नाही! भाजपाची भूमिका!!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2019 11:25 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ या बायोपिकच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला, पण चित्रपटाला असलेला काही राजकीय पक्षांचा विरोध मात्र अद्यापही शमलेला नाही.

ठळक मुद्दे‘पीएम नरेंद्र मोदी’ यांच्या आयुष्यावर बेतलेल्या या चित्रपटात अभिनेता विवेक ओबरॉय मुख्य भूमिकेत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ या बायोपिकच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला, पण चित्रपटाला असलेला काही राजकीय पक्षांचा विरोध मात्र अद्यापही शमलेला नाही.  हा चित्रपट प्रदर्शित झाला, तर ते आचारसंहितेचे उल्लंघन होईल. शिवाय आगामी निवडणुकांमध्ये पंतप्रधान मोदी यांना या चित्रपटामुळे मोठ्या प्रमाणावर राजकीय फायदा होईल. म्हणूनच सध्या तरी हा चित्रपट प्रदर्शित न करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाकडे केली होती. पण मुंबई उच्च न्यायालयाने या चित्रपटाला स्थगिती देण्याची मागणी करणारी जनहित याचिका फोटाळून लावली आणि चित्रपटाच्या मार्गातील कायदेशीर अडथळा दूर झाला. अर्थात काँग्रेस व डाव्या पक्षांनी या चित्रपटाला चालवलेला विरोध थांबलेला नाही. आता भाजपाने यासंदर्भात आपली भूमिका व्यक्त केली आहे. 

होय, निवडणूक आयोगाने या चित्रपटासंदर्भात भाजपाला आपली भूमिका स्पष्ट करण्याचे बजावले होते. त्यानुसार, या चित्रपटाशी आपल्या पक्षाचे काहीही देणेघेणे नसल्याचे भाजपाने निवडणूक आयोगाला कळवले आहे. हा चित्रपट अभिव्यक्ती स्वातंत्र्याशी निगडीत मुद्दा आहे. निवडणूक आचारसंहिता व निवडणूक प्रक्रिया याचेशी याचा काहीही संबंध नाही, असेही भाजपाने आपल्यावतीने स्पष्ट केले आहे.‘पीएम नरेंद्र मोदी’ यांच्या आयुष्यावर बेतलेल्या या चित्रपटात अभिनेता विवेक ओबरॉय मुख्य भूमिकेत आहे.आधी हा चित्रपट ५ एप्रिलला  प्रदर्शित होणार होता.पण प्रदर्शनाच्या ऐन तोंडावर ही रिलीज डेट बदलण्यात आली. आता ‘पीएम नरेंद्र मोदी’ ५ एप्रिलऐवजी १२ एप्रिलला रिलीज होणार आहे.

टॅग्स :पी. एम. नरेंद्र मोदीविवेक ऑबेरॉय