प्लीज, माझ्या मुलांना त्रास देऊ नका! कुणाला विनंती करतोय, अजय देवगण??
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2017 13:32 IST
काही दिवसांपूर्वीच शाहरूख खानची लाडकी लेक सुहाना खान आपल्या मित्रांसोबत ‘ट्यूबलाइट’ हा चित्रपट बघण्यासाठी गेली होती. सुहानाला बघताच काही ...
प्लीज, माझ्या मुलांना त्रास देऊ नका! कुणाला विनंती करतोय, अजय देवगण??
काही दिवसांपूर्वीच शाहरूख खानची लाडकी लेक सुहाना खान आपल्या मित्रांसोबत ‘ट्यूबलाइट’ हा चित्रपट बघण्यासाठी गेली होती. सुहानाला बघताच काही मीडियावाल्यांनी तिचा पाठलाग केला होता. मीडियाचे इतके सारे कॅमेरे बघितल्यानंतर सुहाना प्रचंड घाबरून गेली होती. फोटोग्राफर्स तिची एक झलक टिपण्यासाठी आटापिटा करीत होता. तिचा पाठलाग करीत होता आणि सुहाना त्यांच्यापासून दूर पळू पाहत होती. मीडियाच्या या वागण्याने ‘अनकम्फर्टेबल’ झालेल्या सुहानाचा हा सर्व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता. या व्हिडीओला यू-ट्यूबवर तर प्रचंड हिट मिळाल्या होत्या. या घटनेनंतर किंगखान शाहरूख खान याने मीडियाला आपल्या मुलांपासून दूर राहण्याची विनंती केली होती. शाहरूखची बेस्ट फ्रेन्ड काजोल ही मात्र या घटनेनंतर चांगलीच संतापली होती. सुहानासोबत जे घडले, ते माझ्या मुलांसोबत (न्यासा व युग) घडले असते तर माझा संताप अनावर झाला असता, असे तिने म्हटले होते. शिवाय स्टार किड्सपासून दूर राहा, अशा दटावणीच्या शब्दांत मीडियाला फटकारले होते. आता काजोलचा पती अजय देवगण यानेही नेमका हाच संताप बोलून दाखवला आहे. अर्थात काहीशा विनम्र शब्दांत. ALSO READ : पुन्हा ‘या’ खानने ‘सिंघम’शी घेतला ‘पंगा’! असे केले tweet की, अजय देवगणचा होणार तिळपापड!!आमच्या स्टारडममुळे आमच्या मुलांना त्रास सहन करावा लागतो, हे आम्ही जाणून आहोत. कमी वयात आमच्या मुलांना मोठा दबाव सहन करावा लागतो. त्यामुळे मी मीडियाला विनंती करतो की, आमच्या मुलांना एकटे सोडा. ते खूप लहान आहेत. त्यांना या सगळ्या गोष्टींपासून दूर ठेवा, असे अजयने म्हटले आहे. आता शाहरूख, काजोल व अजयच्या या विनंतीचा मीडियावर किती परिणाम होतो, ते दिसेलच.अजय देवगणचा ‘बादशाहो’ हा सिनेमा प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. यंदाचा अजयचा हा पहिलाच सिनेमा आहे. यात अजय पुन्हा एकदा अॅक्शन अवतारात दिसणार आहे.