‘परी’चा नवा टीजर आऊट! ‘आय लव्ह यूू’ म्हणत घाबरवणारी अनुष्का शर्मा एकदा पाहाच!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2018 10:44 IST
अनुष्का शर्माचा ‘परी’ हा चित्रपट या वर्षात होळीच्या मुहूर्तावर रिलीज होण्यासाठी तयार आहे. या हॉरर चित्रपटातील अनुष्काचा लूक अंगाचा थरकाप उडवणारा आहे. शर्माचा ‘परी’ हा चित्रपट या वर्षात होळीच्या मुहूर्तावर रिलीज होण्यासाठी तयार आहे. या हॉरर चित्रपटातील अनुष्काचा लूक अंगाचा थरकाप उडवणारा आहे. आज अनुष्काने ‘परी’चा नवा टीजर रिलीज केला.
‘परी’चा नवा टीजर आऊट! ‘आय लव्ह यूू’ म्हणत घाबरवणारी अनुष्का शर्मा एकदा पाहाच!!
अनुष्का शर्माचा ‘परी’ हा चित्रपट या वर्षात होळीच्या मुहूर्तावर रिलीज होण्यासाठी तयार आहे. या हॉरर चित्रपटातील अनुष्काचा लूक अंगाचा थरकाप उडवणारा आहे. आज अनुष्काने ‘परी’चा नवा टीजर रिलीज केला. व्हॅलेन्टाईन डेच्या दिवशी अनुष्काने जारी केलेला हा टीजरही याआधी आलेल्या टीजरप्रमाणचे अंगावर काटे आणणारा आहे. अनुष्काने आपल्या सोशल अकाऊंटवर नवे टीजर जारी करताना ‘विल यू बी हर वेलेन्टाईन’ असा सवाल केला आहे. टीजरमध्ये अनुष्कासोबत परमब्रत चॅटर्जी दिसतो आहे. अनुष्का परमब्रतला ‘आय लव्ह यूू’ म्हणते. यावर परमब्रत काहीसे हसत टीव्ही पाहण्यात दंग होतो. यानंतर काही क्षणात अनुष्काचा रक्ताने माखलेला चेहरा आणि तिचे भयावह रूप समोर येते. व्हॅलेन्टाईन डेच्या दिवशी हा टीजर पाहणे भयावह तर आहे पण तेवढेच इंटरेस्टिंगही आहे. अनुष्का या चित्रपटाची को-प्रोड्यूसर आहे. प्रोसित रॉय या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. येत्या २ मार्चला अनुष्काचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. अनुष्का ‘परी’च्या शूटींगसोबतच आनंद एल राय दिग्दर्शित ‘झिरो’ या चित्रपटाच्या शूटींगमध्येही व्यस्त आहे. यात ती शाहरूख खान आणि कॅटरिना कैफसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. याशिवाय प्रदर्शनाच्या वाटेवर असलेल्या संजय दत्तच्या बायोपिकमध्येही अनुष्का एक महत्त्वपूर्ण भूमिका साकारतेय. गत डिसेंबर महिन्यात अनुष्काने क्रिकेटपटू विराट कोहलीसोबत लग्न केले होते. लग्नानंतरचा ‘परी’ हा अनुष्काचा पहिला चित्रपट असणार आहे. ALSO READ : ‘परी’चा आणखी एक टीजर! भल्याभल्यांना फुटेल घाम!!गतवर्षी अनुष्काचे ‘फिल्लोरी’ आणि ‘जब हेरी मेट सेजल’ हे दोन चित्रपट रिलीज झाले होते. पण या दोन्ही चित्रपटांना म्हणावे तसे यश मिळाले नाही. दोन्ही चित्रपट बॉक्सआॅफिसवर दणकून आपटले. त्यामुळे आपल्या या चित्रपटाकडून अनुष्काला मोठ्या अपेक्षा आहेत.