Join us

अनिल कपूरनी शेअर केले लाडक्या कन्येचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2016 15:16 IST

अनिल कपूरनी शेअर केले लाडक्या कन्येचे फोटोलाडकी कन्या सोनमच्या वाढदिवसानिमित्त बाबा अनिल कपूरने इन्स्टाग्रामवर छानसा फोटो अपलोड केला आहे. गुरुवारी सोनम कपूर ३१ वर्षांची झाली. यानिमित्त लहानग्या सोनमसमवेतचा फोटो अनिल कपूर यांनी शेअर केला आहे.

लाडकी कन्या सोनमच्या वाढदिवसानिमित्त बाबा अनिल कपूरने इन्स्टाग्रामवर छानसा फोटो अपलोड केला आहे. गुरुवारी सोनम कपूर ३१ वर्षांची झाली. यानिमित्त लहानग्या सोनमसमवेतचा फोटो अनिल कपूर यांनी शेअर केला आहे.अनिल कपूर यांच्या बाहुत ही छोटी मुलगी आहे. त्या काळी कामात व्यस्त असणारे अनिल उशीरा पार्टीत आले. नाराज झालेल्या सोनमसाठी ते लगेच तयार झाले. त्यांनी हा फोटो काढला. ‘तू निराश झालेली पाहून मला खूप भीती वाटली होती’, असे अनिल कपूर यांनी म्हटले आहे.सोनमची आई सुनीता कपूर यांनीही इन्स्टाग्रामवर फोटो टाकून सोनमला शुभेच्छा दिल्या आहेत.