Join us  

रहस्यमय, थरार आणि नाते संबंधावर आधारित चित्रपट 'फलसफा'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 11:35 AM

'फलसफा' चित्रपट येत्या १४ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ठळक मुद्दे 'फलसफा' चित्रपटात पाहायला मिळणार रहस्यमय, थरारमनित जौरा, गीतांजली सिंग दिसणार मुख्य भूमिकेत

चित्रपट माध्यम हे समाजातील विविध गोष्टींवर नेहमीच प्रकाशझोत टाकून त्यांना रुपेरी पडद्यावर उतरवत असते. असाच एक वेगळा प्रयत्न आगामी "फलसफा" या चित्रपटातून करण्यात आला आहे.  या चित्रपटाची कथा एक तात्विक नाटक आहे जो बदल्याच्या परिस्थितीशी संबंधित आहे आणि एखाद्या व्यक्तीवर त्याचा कसा परिणाम होतो, यावर 'फलसफा' चित्रपट भाष्य करतो.

 'फलसफा' चित्रपटात रहस्यमय, थरार पाहायला मिळणार आहे. हा सिनेमा नाते संबंधावर भाष्य करतो. या चित्रपटाची निर्मिती वी. के. मोशन पिक्चर्स बॅनर अंतर्गत करण्यात आली आहे. या चित्रपटाचे निर्माते वी. के. यादव आहेत. मनित जौरा, गीतांजली सिंग हे कलाकार या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाची कथा, पटकथा व दिग्दर्शन हिमांशु यादव यांनी केले आहे. कॅमेऱ्याची धुरा नीतीश चंद्रा यांनी सांभाळली आहे. या चित्रपटातील गाणी व संगीत सागर भाटिया यांची आहेत. तर नृत्य दिग्दर्शन अरविंद ठाकूर व अॅक्शन आर. पी. यादव यांनी केले आहे. तर कला मनोज निशाद, पार्श्वसंगीत शांतता सुदमे, क्रिएटिव निर्माता नीतीश चंद्रा चित्रपटांचे वितरक आहेत. पेन एन कैमरा इंटरनॅशनलच्या मेहमूद अली यांचे आहे. रहस्यमय, थरार आणि नाते संबंधावर आधारित असणारा 'फलसफा' चित्रपट येत्या १४ सप्टेंबरला संपूर्ण भारतात प्रदर्शित होईल अशी माहिती चित्रपटाचे दिग्दर्शक हिमांशु यादव यांनी सांगितले.