या व्यक्तिसोबत झाले होते सिमी गरवाल यांचे लग्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2017 14:30 IST
सिमी गरेवालने १९६२ साली त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. चित्रपटसृष्टीत प्रवेश घेतल्यावर केवळ तीन-चार वर्षांत दो बदन, साथी या चित्रपटात ...
या व्यक्तिसोबत झाले होते सिमी गरवाल यांचे लग्न
सिमी गरेवालने १९६२ साली त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. चित्रपटसृष्टीत प्रवेश घेतल्यावर केवळ तीन-चार वर्षांत दो बदन, साथी या चित्रपटात त्यांनी सर्वोत्कृष्ट सहकलाकाराची भूमिका साकारली. मेरा नाम जोकर या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेची तर चांगलीच चर्चा झाली होती. या चित्रपटात त्यांनी एक न्यूड सीन दिला होता. सेन्सॉर बोर्डानेही सुरुवातीला या दृश्यावर आक्षेप नोंदवला होता. आज त्यांचा वाढदिवस असून १७ ऑक्टोबर १९४७ ला त्यांचा जन्म पाकिस्तानमध्ये झाला. पण त्यांचे सगळे बालपण इंग्लंडमध्ये गेले. इंग्लंडमध्ये न्यूलँड हाऊसमध्ये त्यांचे शिक्षण झाले. त्या १५ वर्षांच्या असताना त्या मुंबईत आल्या आणि त्यानंतर त्या मुंबईतच स्थायिक झाल्या. त्यांचे इंग्रजी खूप चांगले असल्याने टार्जन गोज टू इंडिया या चित्रपटात त्यांना काम करण्याची संधी मिळाली. रेनदे विथ सिमी गरवाल हा त्यांचा कार्यक्रम प्रचंड गाजला होता. या कार्यक्रमात अनेक सेलिब्रेटींनी त्यांच्या आयुष्याची गुपिते सांगितली होती. सिमी यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी खूपच कमी लोकांना माहिती आहे. त्यांनी दिल्लीतील रवी मोहन यांच्यासोबत लग्न केले होते. पण हे लग्न खूप काळ टिकू शकले नाही. काहीच वर्षांत त्यांचा घटस्फोट झाला. सिमी अनेक वर्षं जामनगरच्या महाराजा सोबत अफेअर होते. त्या १७ वर्षांच्या असल्यापासूनच त्या त्यांच्यासोबत नात्यात होत्या. इंग्लंड मध्ये असताना ते त्यांचे शेजारी होते. त्यांच्यासोबत त्या सिरियस रिलेशनशिपमध्ये होत्या. पण काही कारणांनी त्यांचे ब्रेकअप झाले. सिमी गरवाल यांनी अभिनयासोबतच चित्रपटांचे लेखन आणि निर्देशन केले आहे. सिगा आर्ट इंटरनेशनल या प्रोडक्शन कंपनीची त्यांनी स्थापना केली होती. सिमी गरवाल या आपल्याला अनेकवेळा पांढऱ्या कपड्यात पाहायला मिळतात. पांढरे कपडे परिधान करण्यामागे एक खास कारण असल्याचे त्यांनी त्यांच्या अनेक मुलाखतीत सांगितले आहे. ते सांगतात, पांढरे कपडे घातल्यावर मला एक आत्मिक शांतता मिळते. मी अनेक रंगाचे कपडे आवडीने घेते. पण हे कपडे घालायची माझी इच्छाच होत नाही. ते कपडे तसेच कपाटात पडून राहातात. Also Read : सिमी गरेवालने घेतली बेबोची भेट