Join us  

शाहरूख खानच्या जवळच्या व्यक्तीचे झाले निधन, म्हणाला - तुझी खूप येईल आठवण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 11:50 AM

शाहरूख खानवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

कोरोना व्हायरसमुळे देशात खूप मोठे संकट आले आहे. आतापर्यंत अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. या व्हायरसपासून बचाव करण्यासाठी सरकारने लॉकडाउन जाहीर केला आहे. यादरम्यान बॉलिवूडचा किंग खान शाहरूखवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या जवळचा व रेड चिलीज एण्टरटेन्मेंटचा खूप महत्त्वाच्या व्यक्तीचे निधन झाले आहे.

शाहरूख खानची कंपनी रेड चिलीज एण्टरटेन्मेंटचा खूप खास व्यक्ती अभिजीतचे निधन झाले आहे. अभिजीत शाहरूख खानसोबत रेड चिलीज एण्टरटेन्मेंटची सुरूवात केली होती. रेड चिलीजच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर ट्विट करण्यात आले आहे. त्यात म्हटलंय की, रेड चिलीज कुटुंबातील पहिल्या टीममधील सदस्यांपैकी एक अभिजीतच्या निधनाने आम्हाला खूप धक्का बसला आहे. आमच्यासाठी ते नेहमी जवळपास असतील. त्यांच्या आत्म्यास शांती मिळो. आमच्या संवेदना त्यांचे कुटुंब व मित्रांसोबत आहेत.

 अभिजीतच्या निधनामुळे शाहरूख खूप दुःखी झाला आहे. त्याने ट्विट करत म्हटले की, आपण सगळ्यांनी ड्रिम्ज अनलिमिटेडसोबत सिनेमा बनवायला सुरूवात केली. अभिजीत माझा खूप चांगला सहयोगी होता. आम्ही काही चांगले केले आणि काही चुकीचे...मात्र आम्ही नेहमी पुढे जात गेलो. तो टीमचा मजबूत सदस्य होता. तुझी खूप आठवण येईल माझ्या मित्रा.

शाहरूख खानने सुरूवातीपासून कोरोना व्हायरसच्या विरोधात लढण्यासाठी देशातील जनतेच्या मदतीसाठी पुढे सरसावला आहे.

तसेच इतर लोकांनाही मदत करण्याचे आवाहन केले आहे.

 

टॅग्स :शाहरुख खानकोरोना वायरस बातम्या