Join us  

बाबो...! दिव्या भारतीच्या निधनानंतर घडल्या होत्या अशा काही विचित्र घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2019 9:00 PM

वयाच्या १९व्या वर्षी दिव्याचे अचानक निधन झाल्यामुळे सर्वांना धक्का बसला होता.

बॉलिवूड अभिनेत्री दिव्या भारती सुंदर अभिनेत्रींपैकी एक असून तिने तिच्या लूक्स आणि निरागसतेने रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. तीन वर्षांच्या छोट्या सिने कारकीर्दीत दिव्या भारतीने अनेक सुपरहिट सिनेमे दिले होते. वयाच्या १९व्या वर्षी अपार्टमेंटच्या खिडकीतून पडून दिव्याचा मृत्यू झाला होता. तिच्या मृत्यूनंतर अनेक प्रश्न निर्माण झाले होते.

५ एप्रिल १९९३ रोजी जवळपास रात्री ११ वाजता अचानक दिव्या भारतीचे निधन झाले. दिव्या मुंबईतील वर्सोवा येथील तिच्या पाचव्या मजल्यावरील अपार्टमेंटच्या बाल्कनीतून पडली. सकाळपर्यंत दिव्याच्या निधनाचे वृत्त सिनेइंडस्ट्रीत पसरलं. दोन दिवसानंतर दिव्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तिच्या निधनानंतर असंख्य प्रश्न उभे ठाकले होते.

दिव्याचे निधन झाले त्यावेळी ती काही चित्रपटाचं शूटिंग करत होती. काही सिनेमांचे शूटिंग अर्धे झाले होते. त्यामुळे चित्रपटाचं शूटिंग पुन्हा करावं लागलं. रंग चित्रपटात दिव्या भारतीच्या आयशा जुल्काने काम केलं . आयशा जुल्काने बीबीसीला सांगितलं होतं की, दिव्याच्या निधनानंतर एक खूप मोठी विचित्र गोष्ट घडली. काही महिन्यानंतर आम्ही रंग चित्रपटाचा ट्रायल पाहण्यासाठी फिल्मसिटीला गेलो होतो. जशी दिव्या स्क्रीनवर आली तशी स्क्रीन पडली. आम्हाला हे खूप विचित्र वाटलं.

आयशा जुल्का पुढे म्हणाली की, खूप वेळ विश्वासच बसला नाही. एक आणखीन विचित्र बाब आहे की कदाचित तिला काहीतरी माहित होते. ती नेहमी म्हणायची की, लवकर करा, लवकर चला, जीवन खूप छोटं आहे. तिने कधी स्पष्ट सांगितलं नाही मात्र कदाचित माणसांच्या आतमध्ये एक इंपल्स असतात. तिला प्रत्येक काम लवकर करायचं होतं. तिला जीवनात सगळं काही लवकर मिळत होते.

ती स्वतः सांगायची की तिलाच काही समजत नाही. असं वाटतं की कदाचित तिला माहित होतं की ती आपल्यात जास्त दिवस नसेल.दिव्याच्या मृत्यूनंतर अनेक विचित्र किस्से समोर आले होते. खुद्द दिव्या भारतीच्या आईने सांगितले होते की, दिव्याच्या निधनानंतर दिव्या त्यांच्या स्वप्नात येऊन त्यांना उठवायची. जेव्हा त्याना लवकर उठायचे होते, त्यावेळी दिव्या स्वप्नात येत होती.

इतकेच नाही तर दिव्या साजिद नाडियादवालाची दुसरी पत्नी वर्धाच्या स्वप्नात येत होती.

टॅग्स :दिव्या भारतीसाजिद नाडियाडवालाआयशा जुल्का