Join us  

जुही चावलाने पैशांसाठी नाही तर 'या' कारणामुळे केले होते लग्न,इतक्या वर्षानंतर सत्य आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 7:30 PM

जुहीने जेव्हा जय मेहतासोबत लग्न केले, तेव्हा जय मेहता ३३ वर्षाचे होते आणि जुही २८ वर्षांची होती.जय मेहता लकूमध्ये वयाने मोठे दिसतात.

तिच्या एका स्माईलनं हिंदी सिनेमाला चारचाँद लावले... तिच्या चुलबुली अदा आणि कॉमेडीवर रसिक फिदा झाले असं जिच्याबद्दल म्हटलं जातं ती म्हणजे जुही चावला.जुहीने नव्वदीच्या दशकात अनेक हिट सिनेमे दिले आहेत.अल्पावधीतच तिने आपले स्थान निर्माण केले होते.. तिच्या चुलबुली अदा, कॉमेडी आणि अभिनयाची झलक रुपरे पडद्यावर झळकता चाहतेही तिच्या प्रेमात पडायचे.जुहीच्या प्रत्येक अदांवर रसिक फिदा असायचे. आजही जुहीची जादू कायम आहे. सिनेमात झळकत नसली तरी वेगवेगळ्या कारणांमुळे ती चर्चेत असते. अनेकदा तिच्या लग्नामुळे ती चर्चेत येते. तिच्या लग्नाला इतकी वर्ष झाली तरी यावरच जास्त चर्चा रंगते. मुळात जुही चावला आणि जय मेहता या दोघांची जोडी पाहून अनेकदा चाहते आश्चर्य व्यक्त करताना दिसतात. 

जुहीने जेव्हा जय मेहतासोबत लग्न केले, तेव्हा जय मेहता ३३ वर्षाचे होते आणि जुही २८ वर्षांची होती.जय मेहता लकूमध्ये वयाने मोठे दिसतात. त्यामुळे जुहीने म्हाता-यासोबत लग्न केल्याची खिल्ली उडवली गेली होती.जय मेहता श्रीमंत असल्यामुळेच जुहीने त्यांच्यासह लग्न केल्याची तिच्यावर टीका केली गेली होती.मुळात जुहीने जय मेहतासोबत लग्न केले तेव्हा ही गोष्टी मीडियापासून लपवून ठेवली होती.लग्नानंतर अभिनेत्रींची लोकप्रियका कमी होते असा समज त्यावेळी होती, करियर चालू ठेवायचे होते.म्हणून लग्न झाल्याचे लवपून ठेवल्याचे खुद्द जुहीनेच सांगितले होते.त्यावेळी मीडियाचा इतका गाजावाज नव्हता त्यामुळे लग्नाची बातमी लपवणे तिला शक्य झाले.जुहीच्या लग्नाची पोलखोल जेव्हा झाली तेव्हा ती पहिल्यांदा प्रेग्नेंट झाली, तेव्हा तिने सा-यांसमोर लग्न केल्याचे कबूल केले होते.

जूही चावला ही जय मेहताची दुसरी पत्नी आहे आणि पहिल्या पत्नीच्या निधनानंतर जय मेहताने दुसरे लग्न केले होते. जुही चावलाच्या आईच्या निधनानंतर जुही चावलाही एकाकी पडली होती, त्यामुळे तिने जय मेहतासोबत लग्न केले. दोघांनीही एकमेकांना साथ देण्याचा निर्णय घेतला होता. आज जुही चावला आणि जय मेहता ही जोडी खूप प्रसिद्ध आहे आणि जय मेहता यांचा भारतासोबत परदेशातही मोठा व्यवसाय आहे. 

टॅग्स :जुही चावला