Join us

पीसी पूलसाईड बिर्याणी डेटवर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2016 23:30 IST

प्रियंका चोप्रा तिचा आगामी चित्रपट ‘बेवॉच’ या हॉलीवूडपटासाठी शूटींग करत आहे. 

प्रियंका चोप्रा तिचा आगामी चित्रपट ‘बेवॉच’ या हॉलीवूडपटासाठी शूटींग करत आहे. पण, कितीही थकलं तरी आवडीचं खाद्य मिळालं तरच सेलिब्रिटीही खुश राहतात हे या पीसीच्या उदाहरणावरून वाटतेय.  तुम्ही जगाच्या कोपºयात कुठेही असा, तुम्हाला बिर्याणीवरचे तुमचे प्रेम स्वत:कडे ओढून आणतच असते. हे अगदी खरंय कारण याचं उत्तम आणि ताजं उदाहरण म्हणजे नुकतेच प्रियंका चोप्राने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.ते आहेत चक्क पूलसाईड बिर्याणीचे. स्वत: प्रियंकाने अभिनेत्री मेघन मार्कलसोबत मॉनट्रिअल येथे मस्तपैकी बिर्याणीचा आस्वाद घेतला. इन्स्टाग्रामवर या बिर्याणी आणि वाईन डेटचा फोटो पोस्ट केला आहे. बिर्याणी आणि वाईन काय मस्त आयडिया आहे पीसी?