पीसी दिसणार जेनिफर लोपेझसोबत...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2016 10:36 IST
प्रियंका चोप्रा नुकतीच हॉलीवूड चित्रपट ‘बेवॉच’ ची शूटींग करून भारतात परतली आहे. आता तिने ठरवलेले काही प्रोजेक्ट ती पूर्ण ...
पीसी दिसणार जेनिफर लोपेझसोबत...
प्रियंका चोप्रा नुकतीच हॉलीवूड चित्रपट ‘बेवॉच’ ची शूटींग करून भारतात परतली आहे. आता तिने ठरवलेले काही प्रोजेक्ट ती पूर्ण करण्याच्या प्रयत्नात आहे. लवकरच ती जेनिफर लोपेझ, फुटबॉल प्लेयर ख्रिश्चिनो रोनॅल्डो, अभिनेत्री-मॉडेल मिला योक ोव्हिच, अमेरिकन टीव्ही स्टार रयान सिक्रेस्ट आणि गायक अकॉन यांच्यासोबत एका म्युझिक व्हिडिओमध्ये दिसणार आहे.या गाण्याचे शीर्षक ‘डोन्ट यू नीड समबडी’ हे आहे. नदिर खयात यांचा हा डेब्यू अल्बम असून रेराया आणि शॅगी यांनी या गाण्याला आवाज दिला आहे. प्रियंका यात न्यूड जंम्प सुटमध्ये दिसणार आहे.प्रियंका, जेनिफर लोफेझ आणि रोनाल्डो हे एकत्र एका फ्रेममध्ये दिसणार आहेत. यापेक्षा अजून काय ग्रेट असू शकते? वेल, याशिवाय प्रियंका भोजपुरी प्रोडक्शनअंतर्गत ‘बम बम बोल रहा हैं काशी’ चित्रपटात काम करणार आहे.