Join us

आता राजकुमारी बनणार दिशा पटानी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2018 16:03 IST

चित्रपट 'बागी2' नंतर अभिनेत्री दिशा पटानी आपल्या आगामी प्रोजेक्टच्या तयारीला लागली आहे. आगामी चित्रपट ती राजकुमारी संघमित्राची भूमिका साकारणार ...

चित्रपट 'बागी2' नंतर अभिनेत्री दिशा पटानी आपल्या आगामी प्रोजेक्टच्या तयारीला लागली आहे. आगामी चित्रपट ती राजकुमारी संघमित्राची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाची घोषणा कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये अभिनेत्री श्रृती हसनने केली होती. सुरुवातीला या चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून श्रृतीची निवड करण्यात आली होती. मात्र त्यानंतर तिने या प्रोजेक्टमधून काढता पाय घेतला. यानंतर ऑक्टोबर 2017मध्ये मेकर्सनी या चित्रपटात दिशाची निवड केली आणि त्यानंतर हा चित्रपट होल्डवर गेला. नव्या रिपोर्टनुसार हा चित्रपट जुलै महिन्यांपासून फ्लोरवर येण्याची शक्यता आहे.  रिपोर्टनुसार या चित्रपटाची कथा 'बाहुबली'सारखी असू शकते. कदाचित या चित्रपटाला दोन भागांमध्ये रिलीज केले जाऊ शकते. या चित्रपटाची शूटिंग हैदराबादमध्ये सुरु होईल आणि सगळे काही नीट झाले तर पुढच्या वर्षी या चित्रपटाचा पहिला भाग रिलीज करण्यात येईल.  आठव्या शतकावरील आधारित या चित्रपटासाठी दिशा तलवारबाजीचे प्रशिक्षण घेते आहे. या चित्रपटात तमिळ अभिनेता जयराम रवी आणि आर्या यांची देखील मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट तमिळ, तेलुगू आणि हिंदी भाषेमध्ये रिलीज करण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटाचे बजेट जवळपास 400 कोटींचे आहे. ALSO READ :  टायगर श्रॉफ अगोदर ‘या’ तरुणावर होते दिशा पाटनीचे प्रेम; बायोसेक्शुअल असल्याने झाले ब्रेकअप!पहिल्याच दिवशी दिशा आणि टायगर श्रॉफचा 'बागी2'ने  बॉक्स आॅफिसवर २५.१० कोटी कमाई करून ‘बागी2’ने रेकॉर्ड केला आहे. गत तीन दिवसांत या चित्रपटात ७५ कोटींवर गल्ला जमवला आहे. बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्याआधी दिशाला ‘लोफर’ हा तेलगू सिनेमा मिळाला. यानंतर एका म्युझिक व्हिडिओत ती दिसली आणि यानंतर ‘एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ हा चित्रपट तिला मिळाली. ‘एम एस धोनी : दी अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटात दिशाने धोनीच्या पहिल्या प्रेयसीची भूमिका साकारली होती. या चित्रपटात ती सुशांत सिंह राजपूतच्या अपोझिट दिसली होती. तिच्या यातील अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले होते. यापश्चात इंटरनॅशनल मेगास्टार जॅकी चॅनच्या चित्रपटाची लॉटरी दिशाला लागली.