Join us  

परिणिती चोप्रा करतेय बॉलिवूडमधील या व्यक्तीला डेट?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 12:45 PM

परिणिती गेल्या अनेक महिन्यांपासून बॉलिवूडमधील एका व्यक्तीला डेट करत असल्याचे म्हटले जात आहे.

ठळक मुद्देपरिणिती २०१७ पासून बॉलिवूडमधील प्रसिद्ध असिस्टंट डायरेक्टर चरित देसाईला डेट करत असल्याची चर्चा आहे. पण त्या दोघांच्या नात्याविषयी ती मीडियात बोलणे टाळते.

परिणिती चोप्रा हिने फार कमी वर्षांत बॉलिवूडमध्ये स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. आपल्या फिल्मी करिअरमध्ये परीने काही हिट सिनेमे दिलेत तर काही फ्लॉप. परिणितीच्या इश्कजादे या पहिल्याच चित्रपटाला प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळाले होते. या चित्रपटानंतर परिणितीला खूपच चांगली लोकप्रियता मिळाली. परिणितीला चांगलेच फॅन फॉलोव्हिंग असून तिच्याविषयी जाणून घ्यायची तिच्या चाहत्यांची नेहमीच इच्छा असते.

परिणिती गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपटसृष्टीचा भाग असला तरी ती तिच्या खाजगी आयुष्याविषयी मीडियात बोलणे नेहमीच टाळते. पण ती गेल्या अनेक महिन्यांपासून बॉलिवूडमधील एका व्यक्तीला डेट करत असल्याचे म्हटले जात आहे. परिणिती या व्यक्तीला २०१७ पासून डेट करत असून ही गोष्ट तिच्या सगळ्या जवळच्या व्यक्तींना माहीत आहे. एवढेच नव्हे तर या व्यक्तीने परिणितीची चुलत बहीण प्रियंका चोप्राच्या लग्नाला देखील हजेरी लावली होती. या लग्नात दोघांना सतत एकत्र पाहाण्यात आले होते.

परिणिती २०१७ पासून बॉलिवूडमधील प्रसिद्ध असिस्टंट डायरेक्टर चरित देसाईला डेट करत असल्याची चर्चा आहे. पण त्या दोघांच्या नात्याविषयी ती मीडियात बोलणे टाळते. परिणितीने मुंबई मिररला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या रिलेशनशिप स्टेटसविषयी सांगितले आहे. तिने म्हटले आहे की, माझ्या आयुष्यात कोणी आहे की नाही हे माझ्या कुटुंबियांना आणि माझ्या जवळच्या मित्रमैत्रिणींना चांगलेच माहीत आहे. मी कधीच ही गोष्ट स्वीकारलेली नाही किंवा या गोष्टीला नकार देखील दिलेला नाहीये. माझ्या जवळच्या व्यक्तींना माझ्याबद्दल सगळ्या काही गोष्टी माहीत आहेत हेच माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. मला माझ्या खाजगी आयुष्याविषयी मीडियात कुठेही बोलायचे नाहीये. 

चरित देसाई हा प्रसिद्ध असिस्टंट डायरेक्टर असून त्याने परिणितीची बहीण प्रियंका चोप्रा आणि हृतिक रोशनच्या अग्निपथ या चित्रपटासाठी असिस्टंट डायरेक्ट म्हणून काम केले होते. तसेच करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनच्या अनेक चित्रपटांसाठी त्याने असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले आहे. 

टॅग्स :परिणीती चोप्राप्रियंका चोप्रा