Join us

पापा रोशन आले ट्विटरवर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2016 12:23 IST

सेलिब्रेटींनी सोशल मीडियावर सक्रीय न राहणे दुर्मिळच आहे. पण अजुनही बरेच असे बी-टाऊन सेलिब्रेटी असे आहेत जे ट्विटर-फेसबुकपासून दूरच ...

सेलिब्रेटींनी सोशल मीडियावर सक्रीय न राहणे दुर्मिळच आहे. पण अजुनही बरेच असे बी-टाऊन सेलिब्रेटी असे आहेत जे ट्विटर-फेसबुकपासून दूरच आहेत. हृतिक रोशनचे वडील राकेश रोशन त्यांपैकीच एक होते.मात्र आता काळ बदललाय. मीडियामध्ये मुलाची पाठराखण करण्यात अग्रभागी राहणारे पापा रोशनसुद्धा आता ट्विटरवर आले आहेत. चाहते आणि ‘हेटर्स’ना झटपट रिप्लाय देण्यासाठी राकेश रोशनने या मायक्रो-ब्लॉगिंग साईटवर पदार्पण केले आहे.हृतिकने स्वत: ट्विट करून वडिलांचे सोशल मीडियावर स्वागत केले आणि चाहत्यांना त्यांना फॉलो करण्याची विनंती केली. त्याने लिहिले की, ‘मित्रांना माझे वडिल राकेश रोशन यांचे अखेर ट्विटरवर आगमन झाले. शेवटी त्यांना कोणी तरी समजून सांगितले. पापा, तुमचे येथे स्वागत आहे. एन्जॉय!’}}}}ऋषी कपूरनंतर आणखी एका स्टारचे वडिल टिवटिवाट करण्यास सज्ज झाले म्हटल्यावर सोशल मीडियावर आनंद आहे. रोशन सिनियर कंगना प्रकरणात कोणता ट्विटर बॉम्ब टाकतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.नुकतेच हृतिकच्या ‘काबील’ चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला. पुढील वर्षी जानेवारी महिन्या प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाच्या प्रोमोशनसाठी त्यांनी हे ट्विटर अकाऊंट सुरू केले असल्याचे बोलले जातेय.