Join us  

‘या’ अभिनेत्यावर आली होती पत्नीसोबत बॉईज हॉस्टेलमध्ये राहण्याची वेळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2019 8:00 AM

बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण करणा-या या अभिनेत्याची रिअल स्टोरी कुठल्या फिल्मी स्टोरीपेक्षा कमी नाही.

ठळक मुद्देबॉईज हॉस्टेलमध्ये पंकज पत्नीसोबत राहू लागले. सगळ्या हॉस्टेलला ही गोष्ट माहित होती. पण एनएसडी व्यवस्थापनाला मात्र शेवटपर्यंत ही गोष्ट कळली नाही.

आपल्या अदाकारीने बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण करणारे अभिनेते पंकज त्रिपाठी यांची रिअल स्टोरी कुठल्या फिल्मी स्टोरीपेक्षा कमी नाही. बॉलिवूडमध्ये स्थान मिळवण्यासाठी पंकज यांनी बराच संघर्ष केला. 2004 मध्ये ‘रन’ या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूड डेब्यू केला. पण त्यांची ही भूमिका इतकी छोटी होती की, त्याच्याकडे कुणाचेच लक्ष गेले नाही. पण पंकज यांनी हार न पत्करता, मिळेल त्या भूमिका स्वीकारत आपला प्रवास सुरु ठेवला. अखेर 2012 मध्ये ‘गँग आॅफ वासेपूर’ मिळाला आणि पंकज त्रिपाठी यांना खरी ओळख मिळाली.

एनएसडीमध्ये (नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा) शिकत असताना पत्नीसोबत बॉईज हॉस्टेल राहण्याची वेळ त्यांच्यावर आली. होय, एनएसडीमधून बाहेर पडायला 4-5 महिने उरले असताना पंकज यांनी लग्न केले. जानेवारीत त्यांनी लग्न केले आणि पत्नीला घेऊन दिल्लीला आलेत.

दिल्लीच्या लक्ष्मी नगर भागात एका खोलीत त्यांचा संसार सुरु झाला. लक्ष्मी नगरात राहून रोज ड्रामा स्कूलमध्ये हजेरी लावणे शक्य नव्हते. कारण लक्ष्मी नगर ते ड्रामा स्कूल हे अंतर मोठे होते.  पण एनएसडीने हजेरी बंधनकारक केली आणि पंकज यांना शेवट्च्या महिन्यात रोज क्लासला हजर राहण्याचे आदेश दिलेत. मग काय, यावर तोडगा म्हणून पंकज त्रिपाठी पत्नीलाच घेऊन बॉईज हॉस्टेलमध्ये शिफ्ट झालेत.

बॉईज हॉस्टेलमध्ये पंकज पत्नीसोबत राहू लागले. सगळ्या हॉस्टेलला ही गोष्ट माहित होती. पण एनएसडी व्यवस्थापनाला मात्र शेवटपर्यंत ही गोष्ट कळली नाही. पंकज यांची पत्नी रोज जेवण बनवायची आणि सगळे मित्र जेवणावर ताव मारायचे.  

टॅग्स :पंकज त्रिपाठी