Join us  

मिर्झापूरबाबत पंकज त्रिपाठीने केला खुलासा, म्हणाला - 'नहीं देखे, गलती किए'...

By अमित इंगोले | Published: November 07, 2020 1:12 PM

पंकजने त्याच्या सर्वात मनाजवळच्या भूमिकेबाबात सांगितलं की 'सर्वच भूमिका चांगल्या आहेत. लोकांनी त्यांना खरंच खूप प्रेम दिलंय.

अभिनेता पंकज त्रिपाठीने गेल्या काही वर्षात हिंदी सिने इंडस्ट्रीत आपल्या कामाने मोठ्या प्रमाणात प्रशंसक बनवले आहेत. पण अभिनेत्याचं म्हणणं आहे की, मिर्झापूर वेबसीरीजमधील त्यांने साकारलेली कालीन भैयाची भूमिका त्यांच्या मनाजवळची आहे. कारण या भूमिकेने त्याला लोकप्रिय केलं.

पंकजने त्याच्या सर्वात मनाजवळच्या भूमिकेबाबात सांगितलं की 'सर्वच भूमिका चांगल्या आहेत. लोकांनी त्यांना खरंच खूप प्रेम दिलंय. पण अभिनेतेच्या रूपात कालीन भैयाने मला लोकप्रियता दिली. लोक मला कालीन भैयाच्या नावाने ओळखतात. हे काम चरित्रने केलं. या भूमिकेने मला वास्तवात लोकप्रिय करून टाकलं'. (मुन्ना अमर है! दिव्येंदु शर्माने सांगितलं, 'मिर्झापूर 3' मध्ये परत येऊ शकतो मुन्ना त्रिपाठी; कसा ते वाचा....)

'पाहिली नाही, चूक केली'

पंकज त्रिपाठी ऊर्फ कालीन भैया पुढे म्हणाला की, 'मिर्झापूर एक असा शो आहे जो माझ्या मनाजवळ अधिक आहे. हे जगभरात याचे फॅन्स आहेत म्हणून झालेलं नाही. पण सत्य हे आहे की, हा फार कमी अशा शोपैकी एक आहे ज्यात एक इंटरेस्टींग कथा आणि मनोरंजन आहे. यावर विश्वास ठेवण्यासाठी तुम्हाला हा शो आधी बघावा लागेल. ते म्हणतात ना टेस्ट जाणून घेण्यासाठी हलवा खावा लागतो. मिर्झापूरमध्ये दोन स्वाद आहेत ज्याबाबत तुम्हाला माहीत आहे. हा शो मीस करून तुम्ही कालीन भैयाच नाही तर खुद्द पंकज त्रिपाठीचं मन दुखवलं आहे. पाहिली नाही, चूक केली'. (मिर्झापूरवरून वाढला वाद, खासदार अनुप्रिया पटेल यांना 'कालीन भैया' पंकज त्रिपाठीचं उत्तर....)

गुड्डू पंडीतच्या सूडाची कहाणी

'मिर्झापूर १' बाबत सांगायचं तर या सीझनचा शेवट दोन महत्वाच्या भूमिका बबलू पंडीत आणि स्वीटी गुप्ता यांच्या मृत्यूने होतो. तर यापुढचा सीझन हा त्यांच्या मृत्यूचा बदला घेण्याबाबत आहे. गुड्डू पंडीत आणि गोलू कालीन भैया, मुन्ना त्रिपाठीसोबत भांडताना दिसत आहे. याच्या दुसऱ्या सीझनमध्ये रसिका दुग्गल, विजय वर्मा, राजेश तेलंग, शीबा चड्ढा, प्रियांशु पेंदुली, ईशा तलवार आणि लिलिपुट यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत.

टॅग्स :पंकज त्रिपाठीमिर्झापूर वेबसीरिजवेबसीरिज