पद्मावतीचा बजेटमध्ये झाली वाढ 160 वरुन 200 कोटींवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2017 16:46 IST
रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण स्टारर पद्मावती चित्रपटाचा बजेट 200 कोटी करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. या चित्रपटासाठी ...
पद्मावतीचा बजेटमध्ये झाली वाढ 160 वरुन 200 कोटींवर
रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण स्टारर पद्मावती चित्रपटाचा बजेट 200 कोटी करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. या चित्रपटासाठी संजय लीला भंसाली यांनी निर्मात्याला 200 कोटींचा बेजट दिला होता. मात्र निर्मात्यांनी त्याला नकार दिला. 130 कोटींचा बजेट या चित्रपटासाठी मंजूर करण्यात आला होता. यावर संजय लीला भंसाली नाराज झाले होता. शेवटी 160 कोटींचा बजेटला मंजूरी देण्यात आली. मात्र आता संजय लीला भंसाली यांच्या 200 कोटींच्या बजेटला अखेर मंजूरी मिळाली असल्याचे कळते आहे. 'बाहुबली 2' च्या रिलीजनंतर या चित्रपटाचा बजेट वाढवण्यात आला आहे. जर चित्रपट भव्य बनवलेला असेल तर तो नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो. या चित्रपटासाठी रणवीर सिंगने आपले वजनदेखील वाढवले आहे. आपल्या फॅन्ससाठी त्यांने फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्याच्या फोटोला सोशल मीडियावर खूप लाईक्स मिळते आहे. या चित्रपटात रणवीर अल्लाउद्दीन खिलजीच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. संजय लीला भंसाळी यांचा ‘पद्मावती’ हा चित्रपट चितौडगढची राणी पद्मिनी आणि बादशाह अलाउद्दीन खिलजी यांच्या प्रेमकथेवर आधारित आहे. यात रणवीर आणि दीपिका व्यक्तीरिक्त शाहीद कपूरही आहे. ‘पद्मावती’त राणी पद्मावती व अल्लाउद्दिन खिल्जी यांच्यात रोमॅण्टिक सीन चित्रित केला जाणार,अशी चर्चा ऐकून करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी चित्रपटाच्या सेटवर तोडफोड केली होती. इतिहासाचे चुकिचे दर्शन या चित्रपटातून घडविले जात असल्याचा आरोप संजय लीला भंसाली यांच्यावर करण्यात आला होता. यानंतर पद्मावती’मध्ये काहीही आक्षेपार्ह असणार नाही. राणी पद्मावती हिच्या प्रतिष्ठेला धक्का लागेल, असेही काहीही पडद्यावर दाखवण्याचे आमचे प्रयत्न नाहीत, असे संजय लीला भंसाली यांच्याकडू त्यांनी स्पष्ट करण्यात आल्यानंतर हा वाद मिटला होता. त्यामुळे चित्रपटाची रिलीज डेट पुढे जाते का ?, असा प्रश्न अनेकांना पडला होता. मात्र भंसाली याच वर्षाच्या अखेरीस पद्ममावती प्रदर्शित करणार आहेत.