Join us

Padmaavat:राजा रावल रतन सिंग ही भूमिका शाहिद कपूर आधी या अभिनेत्याला ऑफर करण्यात आली होती?जाणून घ्या कोण आहे तो अभिनेता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2018 11:43 IST

शाहिद कपूर,दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांचा ‘पद्मावत’ आता सिनेमागृहात रिलीज झाला आहे.सिनेमात अलाउद्दीन खिलजी (रणवीस सिंग) पद्मावती(दीपिका पादुकोण) ...

शाहिद कपूर,दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांचा ‘पद्मावत’ आता सिनेमागृहात रिलीज झाला आहे.सिनेमात अलाउद्दीन खिलजी (रणवीस सिंग) पद्मावती(दीपिका पादुकोण) आणि  राजा रावल रतन सिंग (शाहिद कपूर) यांनी साकारलेल्या भूमिका खूप चर्चेचा विषय ठरत आहे. सिनेमाच्या घोषणे पासूनच जस जसे सिनेमातल्या वेगवेगळ्या गोष्टी बाहेर येत गेल्या तसे सगळेच कॅरेक्टर रसिकांच्या पसंतीस उतरले. मग शाहिदने साकारलेला राजा रतन सिंग असो किंवा मग रणवीरने साकारलेला अलाउद्दीन खिलजी  असो सगळेच कॅरेक्टर प्रदर्शनापूर्वीच रसिकांची पसंती मिळवण्यात यशस्वी ठरले.सध्या रणवीर आणि शाहिद कपूर दोघांचे खूप कौतुक होत असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच अलाउद्दीन खिलजीच्या पत्नीची भूमिका साकरणारी अभिनेत्री अदितीराव हैदरीही रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली आहे.पण तुम्हाला माहिती आहे का? शाहिदला ऑफर करण्यात आलेली राजा रावल रतन सिंग भूमिका आधी बॉलिवूडचा बादशाहा शाहरूख खानला ऑफर करण्यात आली होती. मात्र संजय लिला भन्साळींना शाहरूखला भली मोठी रक्कम चुकवणे परवडण्यासारखे नव्हते.शाहरूखने राजा रतन सिंगची भूमिका करण्यासाठी जवळपास 90 कोटींची मागणी केली होती.शाहरुखच्या माधनधानाचा आकडा ऐकून संजय लीला भन्साळींनी त्याला चित्रपटात घेण्याचा विचार सोडून  दुस-या अभिनेत्याचा शोध सूरु केला. त्याचदरम्यान त्यांनी या भूमिकेसाठी शाहिद कपूरला ही भूमिका ऑफर केली.भन्साळींचा सिनेमा असल्यामुळे नाही बोलण्याचा प्रश्न येतच नाही. आणि दुसरे म्हणजे 9 ते 10 कोटी इतकी मानधनही शाहिदला देण्यात आले.शाहरूखच्या तुलनेत हे शाहिदने स्विकारलेले मानधन फारच कमी होते.अशा प्रकारे शाहरूखने हा सिनेमा नाकारला आणि अखेर शाहिदनेच  राजा रावल रतन सिंग ही भूमिका साकारली. या भूमिकेसाठी त्यानेही खूप मेहनत घेतली आणि आज त्याने केलेल्या मेहनतीमुळेच शाहिदचे सर्वच स्थरावरून कौतुक होत आहे. 'पद्मावत' हा सिनेमा शाहिद कपूरला त्याच्या करिअरसाठी मोठा टर्निंग पॉईंट ठरू शकतो असेही बोलले जात आहे.एक ऐतिहासिक कथा भन्साळी यांनी त्यांच्या ‘लार्जर दॅन लाईफ’ पद्धतीने मांडल्यामुळे हा सिनेमा पाहण्याची रसिकांमध्ये उत्सुकता असल्याचे पाहायला मिळत आहे़.Also Read:Padmaavat Quick Movie Review:‘बाहुबली’ची भव्यता गाठणारा ‘पद्मावत’