Join us

Padmaavat Box Office Collection : प्रखर विरोधानंतरही ‘पद्मावत’ची जोरदार कमाई!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2018 17:37 IST

प्रचंड विरोधानंतर प्रदर्शित झालेल्या संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावत’ला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. यांचा अंदाज बॉक्स आॅफिसवरून कलेक्शनवरून ...

प्रचंड विरोधानंतर प्रदर्शित झालेल्या संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावत’ला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. यांचा अंदाज बॉक्स आॅफिसवरून कलेक्शनवरून येतो. ट्रेड एनालिस्ट तरण आदर्शच्या रिपोर्टनुसार, ‘पेड प्रिव्ह्यूच्या कमाईच्या आकड्यांसह चित्रपटाने केवळ तीनच दिवसांमध्ये ८३ कोटी रूपयांपेक्षा अधिक कमाई केली आहे. शनिवारी चित्रपटाच्या तिजोरीत तब्बल २७ कोटी रूपयांचा गल्ला जमा झाला, तर चित्रपटाने पेड प्रिव्ह्यूमध्ये पाच कोटी, गुरुवारी १९ कोटी, तर शुक्रवारी ३२ कोटी रूपयांची जबरदस्त कमाई केली आहे. तरण आदर्श यांनी अपेक्षा व्यक्त केली की, प्रदर्शनाच्या चौथ्या दिवशी म्हणजेच रविवारी हा चित्रपट शंभर कोटींच्या क्लबमध्ये स्थान मिळवेल. असे घडल्यास पहिल्याच विकेंडमध्ये चित्रपट शंभर कोटी रूपयांचा आकडा पार करणारा ठरेल. हा चित्रपट २०० कोटी रूपये खर्चून बनविण्यात आला आहे. सुरुवातीच्या चार दिवसांमध्येच चित्रपटाने निम्मी कमाई केली असल्याने पुढील दिवसांमध्ये चित्रपट किती कोटींपर्यंत मजल मारेल हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.  भारताव्यतिरिक्त चित्रपट ओव्हरसीज मार्केटमध्येही जबरदस्त प्रदर्शन करीत आहे. ट्रेड एनालिस्ट रमेश बाला यांच्या रिपोर्टनुसार, चित्रपटाने सुरुवातीच्या तीनच दिवसांमध्ये आॅस्ट्रेलिया ६.४५ कोटी, न्यूझीलॅण्ड १.२४ कोटी, तर उत्तर अमेरिकेत २०.१० कोटी रूपयांची कमाई केली आहे. दरम्यान, चित्रपट सुरुवातीपासूनच वादाच्या भोवºयात सापडला असल्याने राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि गोवा या राज्यांमध्ये प्रदर्शित करण्यात आला नाही. मात्र आता गोव्यातील विरोध निवळला असल्याने रविवारपासून येथे चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. त्यामुळे कलेक्शनमध्ये भर पडण्याची शक्यता आहे.