Join us

म्हणून ओशाळला आयुषमान !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2016 13:40 IST

कलाकार आपल्या भूमिकांसाठी मेहनत घेत असतात हे आपण पाहिलं आणि ऐकलं आहे. मग त्या भूमिकेला न्याय देण्यासाठी बॉडी कमावणं ...

कलाकार आपल्या भूमिकांसाठी मेहनत घेत असतात हे आपण पाहिलं आणि ऐकलं आहे. मग त्या भूमिकेला न्याय देण्यासाठी बॉडी कमावणं असो किंवा मग एखादा नवा प्रयोग. असाच काहीसा प्रयोग आता अभिनेता आयुषमान खुराणाही करत आहे. मात्र हाच प्रयोग आयुषमानला काहीसा लाजवणाराही वाटतोय. सिनेमात तरुणाची भूमिका साकारण्यासाठी आयुषमाननं आपली दाढी काढलीय. दाढीविना नग्न असल्यासारखं भासतं अशी काही भावना खुद्द आयुषमाननं व्यक्त केली आहे.दुसरीकडे याच सिनेमातील भूमिकेसाठी आयुषमान आणखी एक प्रयोग करत आहे. आयुषमान सध्या बंगाली भाषेचे धडे घेतोय. 'मेरी प्यारी बिंदू' या आगामी सिनेमात आयुषमान बंगाली तरुणाची भूमिका साकारत आहे.या सिनेमात आयुषमानची को-स्टार परिणिती चोप्रा असणार आहे. सिनेमाचं बहुतांश शुटिंग हे कोलकात्यामध्ये होणार आहे.